Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रकरोना लसीच्या प्रभावी वितरणाचे नियोजन करा - पंतप्रधान

करोना लसीच्या प्रभावी वितरणाचे नियोजन करा – पंतप्रधान

नवी दिल्ली –

देशाच्या सर्व भागांत आणि देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत करोनाची लस लवकरात लवकर पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रभावी आणि योग्य नियोजन करण्यात यावे

- Advertisement -

असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशात बाधितांची संख्याकमी झाली म्हणून गाफील राहू नका, योग्य ती काळजी घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली. करोनावर लस विकसित झाल्यानंतर देशभर तिचा पुरवठा कसा करता येईल, याचा पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह आरोग्य मंत्रालय तसेच नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देशाने ज्याप्रमाणे निवडणूक प्रणाली विकसित केली, त्याचप्रमाणे लस वितरण प्रणालीही विकसित करण्याची आवश्यकता प्रतिपादित करीत मोदी म्हणाले की, या प्रणालीत सरकार आणि देशातील नागरिकांचे प्रत्येक टप्प्यात योगदान असले पाहिजे. करोनाची लस विकसित झाल्यानंतर तिच्या वितरणात आपल्या देशापुरते वा शेजारी देशांपर्यंत मर्यादित न ठेवता वैश्विक पातळीपर्यंत आपल्या प्रयत्नांची व्याप्ती वाढवली पाहिजे. करोनाची सद्य:स्थिती पाहता, देशाच्या सर्व भागांत तिचा गतीने पुरवठा करण्याच्या दृष्टीने सखोल आणि प्रभावी नियोजन केले पाहिजे.

यासाठी लसीचा साठा, तिचे वितरण आणि प्रशासन या आघाड्यांवर नियोजनाची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. देशातील करोनाच्या सक्रियबाधितांच्या संख्येतघट होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. येत्या सणांच्या काळात मुखाच्छादन वापरणे, वारंवार हात धुणे तसेच भौतिक दूरतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. बाधितांचे प्रमाण कमी झाले, याचा अर्थ करोना संपत आहे, असा मुळीच होत नाही. योग्य उपचार आणि प्रत्येक जण स्वत:ची घेत असलेली काळजी, यामुळे बाधितांची संख्याकमी होत आहे. बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आगामी काळ सणासुदींचा असल्याने निष्काळजीपणा दाखवू नका. स्वत:ची, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या