Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशPM Modi News: PM मोदींच्या विमानात होऊ शकतो बॉम्बस्फोट; मुंबई पोलिसांच्या कंट्रोल...

PM Modi News: PM मोदींच्या विमानात होऊ शकतो बॉम्बस्फोट; मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा मेल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याची धमकी देण्यात आली. मोदी अमेरिकेला जात असलेल्या विमानात दहशतवादी बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ सूत्रे हालवत चेंबूर परिसरातून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संशयित आरोपीची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा एक मेल करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून अटक केली. तो व्यक्ती मानसिकृष्ट्या आजारी आहे.

११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता,यामध्ये पंतप्रधान मोदी अधिकृत परदेश दौऱ्यावर जात असताना दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात असा इशारा देण्यात आला होता. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना त्याबद्दल माहिती दिली आणि तपास सुरू केला.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स देशाच्या दौऱ्यावर आहेत, त्यानंतर ते अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी पोलिसांना मिळाली. ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये एका अज्ञात व्यक्तीने फोन करत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांकडून तात्काळ सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देत तपास सुरू कऱण्यात आला होता.

YouTube video player

याआधीही असे धमकीचे मेल आले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर एक धमकी पाठवण्यात आली होती, यामध्ये दोन कथित आयएसआय एजंट्सचा समावेश असलेल्या बॉम्बस्फोटाच्या कटाचा दावा करण्यात आला होता. याशिवाय, गेल्या वर्षी, कांदिवलीतील ३४ वर्षीय रहिवासी शीतल चव्हाण याला पंतप्रधान यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : शिर्डीतील तरुणाला जिवंत जाळले, कुख्यात पोकळेसह टोळी जेरबंद

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि निर्घृण खुनाची घटना उघडकीस आली आहे. राहाता परिसरातून बेपत्ता झालेल्या सचिन गिधे या तरुणाचा...