Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापापुआ न्यू गिनी मध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत

पापुआ न्यू गिनी मध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर असून दुसऱ्या टप्प्यासाठी रविवारी पापुआ न्यू गिनीमध्ये पोहोचले. FIPIC परिषदेत सहभागी होण्यासाठी पीएम मोदी पापुआ न्यू गिनीमध्ये दाखल होताच त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे (James Marape) यांनी स्वागत केले.

- Advertisement -

पापुआ न्यू गिनीच्या विमानतळावर यजमान देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींचे चरणस्पर्श करून स्वागत केले. पापुआ न्यू गिनीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारतातील पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदींचे हे स्वागत देखील खास आहे. कारण या देशात असा नियम आहे की, सूर्यास्तानंतर तेथे आलेल्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत केले जात नाही. मात्र पंतप्रधान मोदींचे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून यावेळी असंख्य अनिवासी भारतीय उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर ही देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २२ मे रोजी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांसोबत भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्यासाठी तिसऱ्या फोरम FIPIC शिखर परिषदेत सहभागी होतील. या बैठकीत १४ देशांचे नेते सहभागी होणार आहेत. FIPIC ची स्थापना २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्या दरम्यान झाली होती.

FIPIC परिषदेत १४ देशांचे नेते सहभागी होणार असून कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे हे सर्व क्वचितच एकत्र येतील. FIPIC मध्ये कुक आयलंड, फिजी, किरिबाटी, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नाउरू, नियू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा, तुवालू आणि वानुआतु यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी मरापे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब डेड यांचीही भेट घेतील.

पापुआ न्यू गिनीला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी येथून थेट ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. तेथे ते अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आतापासून ऑस्ट्रेलियात हॅरिस पार्क परिसर ‘लिटिल इंडिया’ म्हणून ओळखला जाईल. पंतप्रधानांच्या सामुदायिक कार्यक्रमादरम्यान याची घोषणा केली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या