Thursday, November 21, 2024
Homeदेश विदेशIndependence Day 2024 : वैद्यकीय शिक्षणासंदर्भात PM मोदींची महत्वपूर्ण घोषणा

Independence Day 2024 : वैद्यकीय शिक्षणासंदर्भात PM मोदींची महत्वपूर्ण घोषणा

दिल्ली । Delhi

संपूर्ण देश ७८ वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2024) साजरा करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले.

- Advertisement -

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट (Rajghat) येथे जाऊन महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय शिक्षणासंदर्भात (Medical Education) महत्वपूर्ण घोषणा केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विकसित भारत करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, डॉक्टर (Doctor) होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं. त्यासाठी त्यांना कुठल्याही देशांमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागतं. मात्र त्यासाठी त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. आम्ही मागच्या १० वर्षात मेडीकल सीट वाढवून १ लाख केल्या आहेत. त्यामुळे आता येत्या ५ वर्षांत ७५,००० जागा वाढवण्यात येतील, असं सरकारनं निश्चित केल्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. (PM Modi 78th Independence Day Speech)

तसेच या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. भारताचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पाना घेऊन पुढे गेलो तर २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Indian Independence Day 2024)

दरम्यान, स्वातंत्र्या दिन २०२४ च्या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर सकाळीच लाल किल्ल्यावर दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीताराम आदींसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आहे. त्यामुळे हा ११ वेळा सलग लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. आजच्या या सोहळ्याला ६ हजार विशेष पाहुणे उपस्थित आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या