Friday, November 22, 2024
HomeराजकीयBudget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी PM मोदी काय म्हणाले?

Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी PM मोदी काय म्हणाले?

दिल्ली । Delhi

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session 2024) सुरुवात होत आहे. या अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. विरोधकांनी आता त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामं करावीत असंही आवाहन नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलं.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे अधिवेशन देशवासीयांच्या स्वप्नांचा पाया रचणार आहे. आपल्या सर्वांचे काम संपूर्ण देश बारकाईने पाहत आहे. तब्बल ६० वर्षांनी एकाच पक्षाचे सलग तिसऱ्यांदा सरकार आले, ही अभिमानाची बाब आहे. तिसऱ्या पर्वाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळणे ही गर्व करण्यासारखी गोष्ट आहे. मी देशवासीयांना जी हमी दिली आहे, त्याची अंमलबजावणी करणारा हा अर्थसंकल्प असेल. हा अर्थसंकल्प आपल्याला मिळालेल्या 5 वर्षांच्या संधीची दिशा ठरवणारा असणार आहे. २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अर्थसंकल्प मजबूत पाया रचणारा आहे..

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकले हरवलेले बाबा; विरोधकांचं टीकास्त्र

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने विकसित होत असून ही प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण ८ टक्के वाढीसह पुढे जात असून भारतात सकारात्मक दृष्टिकोन, गुंतवणूक आणि उत्तम कामगिरीचे वातावरण आहे. देशवासीयांनी त्यांचा निर्णय घेतला असून आता येत्या ५ वर्षात पक्षासाठी नाही तर देशासाठी लढण्याची जबाबदारी सर्व निवडून आलेल्या खासदारांची आहे. असे म्हणत त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना आवाहन केले.

आज मला खूप दुर्दैवाने हे सांगावं लागतं आहे की २०१४ च्या नंतर काही खासदार ५ वर्षांसाठी निवडून आले, काही १० वर्षांसाठी. मात्र अनेक खासदारांना आपल्या क्षेत्राबाबत बोलता आलं नाही. कारण काही पक्ष नकारात्मक राजकारण करत होते. देशाच्या खासदारांचा अमूल्य वेळ काही पक्षांनी अपयश झाकण्यााठी केला. आता मी हे आवाहन करतो आहे की जे पहिल्यांदा निवडून आले आहेत त्यांना बोलण्याची संधी द्या, त्यांचे विचार ऐका. खासदारांना पुढे येऊन बोलण्याची संधी द्या. देशाच्या जनतेने आम्हाला कौल दिला, मात्र आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला. अडीच तास देशाच्या पंतप्रधानांना बोलू दिलं जात नाही. या गोष्टीचा त्यांना पश्चात्तापही नाही. मी आज आग्रहपूर्वक सांगतो आहे, आम्हाला देशाच्या जनतेने देशासाठी पाठवलं आहे, पक्षासाठी नाही. १४० कोटी देशाच्या जनतेसाठी आम्ही येथे आलो आहोत. देशाच्या जनतेचे मी धन्यवाद देतो असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : तुमचा भंपकपणा आम्ही उघडा करणार; भाजपच्या दरेकरांचा जरांगेंना इशारा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या