Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi Speech : "महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत नव्या कायद्यात..."; पंतप्रधान मोदींचे मोठे...

PM Modi Speech : “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत नव्या कायद्यात…”; पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

जळगाव | Jalgaon

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. विरोधकांसह नागरिकांनी या घटनांविरोधात आंदोलनाचा (Agitation) आक्रमक पवित्रा घेतला असून राजकीय वातावरणही तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जळगावच्या लखपती दीदी (Lakhpati Didi) मेळाव्यात मोठे विधान केले आहे.

हे देखील वाचा : PM Modi Speech : जळगावमध्ये महिलांचा महासागर – पंतप्रधान मोदी

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांवर (Women) अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आमचे सरकार कडक कायदे करत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणीही त्यात छेडछाड करणार नाही, याबाबतही आम्ही निर्णय घेतला आहे. या गुन्ह्यांबाबत वेगाने तपास सुरु करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळण्यातही मदत होईल. अल्पवयीन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची नव्या कायद्यात तरतूद केली गेली आहे, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Eknath Khadse : निमंत्रण मिळाले तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही; खडसे असं का म्हणाले?

मोदी पुढे म्हणाले की, पहिले तक्रारी यायच्या की वेळेवर गुन्हा (Case) दाखल होत नाही. सुनावणी होत नाही. खटल्यांना खूप वेळ लागतो. अशा अनेक अडचणींना भारतीय न्याय संविधानाने दूर केले आहे. यामध्ये संपूर्ण चाप्टर महिला आणि मुलांसोबत होणाऱ्या अत्याचारसंबंधी केले आहे. जर पीडित महिलांना पोलीस ठाण्यामध्ये जायचे नसेल, तर घरात बसल्याही एफआयएर करू शकतात. त्यामुळे कुठलीही गडबड होणार नाही. तसेच आता लवकर प्रतिसाद मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : महाराष्ट्रभरात पुढील ३-४ दिवस मुसळधार! कोणत्या भागात, कोणता अलर्ट? जाणून घ्या

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्यासोबत

सध्या लग्नाच्या नावाखाली धोका दिल्याचे प्रकरणेही समोर येतात. महिलांवरील अत्याचार (Torture) रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक गोष्टीत राज्य सरकारच्या सोबत आहे. आपल्याला भारताच्या समाजाकडून या पापी मानसिकतेला थांबवावे लागेल. भारत विकसित होण्याच्या मार्गावर जात आहे आणि त्यात महाराष्ट्राच्या भूमीचे मोठे योगदान आहे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या