Tuesday, February 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय...

Sharad Pawar: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झाल?

पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी तात्काळ पुण्यातील रुबी रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी छातीत कफ झाल्याने शरद पवारांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी शरद पवार यांना फोन केला होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता.

- Advertisement -

शरद पवार यांना सोमवारी प्रकृतीचा त्रास जाणवत असल्यामुळे बारामतीवरुन पुण्यात आणण्यात आले होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या. मात्र, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला होता. शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही तासांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याने त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

YouTube video player

DCM Sunetra Pawar: परंपरेचा पुढचा अध्याय, भावनिक क्षणी, सुनेत्रा अजित पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार

डॉक्टरांनी शरद पवारांच्या तब्येती विषयी दिली माहिती
रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी दिली. पवार यांचे सर्व जीवनसत्त्वीय निकष (व्हायटल पॅरामिटर्स) सामान्य मर्यादेत असून त्यांची एकूण प्रकृती स्थिर आणि सुधारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयात दाखल होताना जाणवलेला सौम्य त्रास उपचारांमुळे आता कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अद्याप निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या ठराविक वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व तपासण्या नियमितपणे करण्यात येत आहेत. पुढील उपचारांबाबतचे निर्णय पवार यांच्या प्रकृतीतील प्रगती लक्षात घेऊन घेण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

ताज्या बातम्या

Chandrapur Mayor Election: चंद्रपूरात ठाकरेंच्या शिवसेनेने केला काँग्रेसचा गेम; महापौरपदी भाजपच्या...

0
चंद्रपूर | Chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेत धानोरकर आणि वडेट्टीवार वादाचा फटका काँग्रेसला (Congress) बसला आहे. आज (मंगळवारी) महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाली असता त्यात भाजपाच्या...