Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशलाल किल्ल्यावरुन PM मोदींचं मणिपूर हिंसाचारावर भाष्य म्हणाले, “काही दिवसांपासून सातत्याने...”

लाल किल्ल्यावरुन PM मोदींचं मणिपूर हिंसाचारावर भाष्य म्हणाले, “काही दिवसांपासून सातत्याने…”

दिल्ली | Delhi

मागील काही महिन्यांत मणिपूरमधील हिंसाचारात अनेक नागरिकांचा जीव गेला. तसेच महिलांवर अत्याचाराच्या घटनाही घडल्याचं समोर आलं. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरात मणिपूर हिंसाचाराचा विषय चर्चेत आला. आज (१५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ला येथे साजरा होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मणिपूरमध्ये (Manipur) काही दिवसांपूर्वी हिंसाचार सुरू होता. मात्र काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहेत. संपूर्ण देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. लोकांनी शांततेत आणि उत्साहाने स्वातंत्र्य उत्सव पुढे न्यावा. शांततेनेच सर्व प्रश्नांवर मार्ग निघेल. केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील.

“पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…”; लाल किल्ल्यावरून PM मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

यानंतर पंतप्रधानांनी वर्षभरामध्ये देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींचा उल्लेख केला. माझ्या प्रिय कुटुंबियांनो नैसर्गिक आपत्ती देशातील अनेक भागांमध्ये दिसून आल्या. ज्यांना या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला त्या कुटुबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार मिळून त्या सर्व संकटांवर मात करुन पुढे जाऊ असा विश्वास व्यक्त करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या