नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या एका आठवड्यापासून संपूर्ण भारतात इंडिगोची विमानसेवा कोलमडली आहे. इंडिगोच्या अनेक विमानांचे उड्डाण रद्द होत आहे, तर काही विमानांच्या उड्डाणाला विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला समोरे जावे लागत आहे. विमानसेवेच्या गोंधळाबाबत अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला जात असून ही अद्यापपर्यंत परिस्थिती पुर्वपदावर आली नाही.
या सर्व परिस्थितीनंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत महत्वाच्या सूचना दिल्या आहे. इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाबाबत आता पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बोलले आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज (९ डिसेंबर) सांगितले की, इंडिगो विमानसेवेच्या निर्माण झालेल्या गोंधळाबाबत पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे.
इंडिगोचे अनेक विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, ‘नियम आणि कायदे महत्त्वाचे, पण त्यांचा उद्देश व्यवस्था सुधारणे हाच असला पाहिजे, लोकांना त्रास देणे हा नाही. नियम लोकांना त्रास देण्यासाठी नाही, तर व्यवस्था सुधारण्यासाठी असतात’, असे मोदींनी म्हटले असल्याची माहिती किरेन रिजिजू यांनी दिली.
भारताच्या नागरिकांना कोणताही त्रास केवळ यासाठी होऊ नये की तो भारतीय आहे, तो होऊ नये ही आपली जबाबदार असल्याचे मोदी यांनी सांगितले. नियम आणि कायदे चांगले आहेत. परंतू त्यांचा वापर सिस्टीम चांगली होण्यासाठी व्हायला हवा, जनतेला त्रास देण्यासाठी नव्हे. पीएम मोदी म्हणाले की सरकारच्या सुधारणा संपूर्ण नागरी केंद्री आहेत. आमचे लक्ष्य लोकांच्या दैनंदिन अडथळे दूर करण्याचे असून त्यामुळे ते संपूर्ण क्षमतेने पुढे जाऊ शकतील.
पीएम मोदी यांनी सर्व खासदारांना आपआपल्या निवडूक क्षेत्रात काम करण्यासाठी सांगितले. ते म्हणाले रुल्स आणि रेग्युलेशन चांगले आहेत. परंतू जनेतला त्रास होता कामा नये. कायदा जनेतेचे जीवन सोपे करण्यासाठी आहे. क्रीडा क्षेत्रात आणखीन वेगाने काम करण्याची गरज आहे. त्यांनी खासदारांना तरुणांशी एकरुप व्हायला सांगितले. किरेन रिजिजू यांनी बैठकीत प्रत्येक क्षेत्रात सुधारणा कशा होतील विकास कसा होईल यावर बैठकीत जोर दिला गेला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





