Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशPM Narendra Modi : १८ वर्षांनंतर पंतप्रधान मोदींनी केली गिर नॅशनलची सफारी;...

PM Narendra Modi : १८ वर्षांनंतर पंतप्रधान मोदींनी केली गिर नॅशनलची सफारी; पाहा खास Photo

नवी दिल्ली | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर (Gujarat Tour) असून त्यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील (Junagadh District) गिर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्याला भेट दिली. यावेळी मोदींनी काही मंत्री आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सिंह सफारीचा आनंद घेतला. मोदींनी या सफारीचे फोटो त्यांच्या एक्स (ट्विटर) या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

- Advertisement -

वन्यजीव आणि विशेषतः सिंह पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी गिर राष्ट्रीय उद्यान एक अद्वितीय पर्यटनस्थळ आहे.येथे येणाऱ्या पर्यटकांना सिंहांच्या मुक्त संचाराचा थरार आणि विविध वन्यजीवांचे नैसर्गिक वातावरणात निरीक्षण करण्याची संधी मिळते. त्यामुळे वन्यजीव छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही असे म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जंगलाच्या (Forest) सफरीवेळी अभयारण्यात मुक्त वावर करणाऱ्या या जंगलच्या राजाचे काही फोटोसुद्धा आपल्या खास कॅमेरामध्ये टीपले.

दरम्यान, गिरमधील या खास सफरीदरम्यान पंतप्रधान मोदी अगदी कमाल पोषाखात पाहायला मिळाले. जंगल सफारीसाठी सहसा पसंती जिलं जाणारं कॅमोफ्लज शर्ट, त्यावर जॅकेट, सफारीची हॅट असा त्यांचा लूक होता. मोदी सूर्योदयापासूनच गिरच्या (Gir National Park) या अभयारण्यामध्ये जीपतून सफारीसाठी निघाले होते. यावेळी त्यांनी या जंगलाची कैक रूपे आपल्या नजरेसह कॅमेरामध्येही कैद केली.

गिर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली?

गिर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना १९६५ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून करण्यात आली, त्यानंतर २५८.७१ चौरस किलोमीटर क्षेत्र १९७५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. हे उद्यान आशियाई सिंहांचे शेवटचे अधिवासस्थान मानले जाते. तर सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार देशात आशियाई सिंहांच्या संरक्षणासाठी ‘प्रोजेक्ट लायन’ अंतर्गत केंद्राच्या वतीने २९०० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...