Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रदिवाळीला 'समृद्धी'च्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ होणार?

दिवाळीला ‘समृद्धी’च्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ होणार?

शिर्डी | Shirdi

दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे सरकार महाराष्ट्रातील जनतेला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

नागपूर ते शिर्डी या महामार्गाच उद्घाटन गेल्या १ मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होतं. पण, काही कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शुभारंभ लांबणीवर पडला आता हा शुभारंभ होण्याचे संकेत मिळत आहेत.

नागपूर ते मुंबई हा ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग असेल. १० जिल्हे, २६ तालुके आणि आसपासच्या ३९२ गावांना हा मार्ग जोडतो. याची गती मर्यादा १५० किमी आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त ८ तासात कापले जाईल.

मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी ४ तास आणि औरंगाबाद ते नागपूर ४ तास वेळ लागेल, या मार्गामुळे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, वर्धा व जालना कोरडे बंदरे आणि मुंबईच्या जेएनपीटीला जोडली जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या