Tuesday, May 21, 2024
Homeनंदुरबारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांना मोठी ऑफर; म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांना मोठी ऑफर; म्हणाले…

नंदुरबार | Nandurbar
देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सध्या देशात चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराचा धडाका सुरु आहे. त्यातच आज नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावीत यांच्या प्रचारासाठी मोदी नंदुरबारमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, . “शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढे ते असे ही म्हणाले की, गेल्या ४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले असून त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करुन असे वक्तव्य केले असावे असे मला वाटते. चार जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये टिकून राहायचे असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल असे त्यांना वाटत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल जाहीर; दोघांना जन्मठेप तर तिघांची सुटका

मी हे पूर्ण जबाबदारीने बोलतोय की, वंचितचा जो अधिकार आहे, त्याचे आम्ही चौकीदार आहोत” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “धर्माच्या आधारावर आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहे. दलित, मागास, आदिवासी यांचे आरक्षण काढून आपल्या वोटबँकला देण्याचा काँग्रेसचा एजेंडा आहे” असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.

शरद पवार काय म्हणाले होते
आमची आणि काँग्रेसची विचारधारा सारखी आहे. आमचा सोबत काम करण्याचा अनुभव आहे. निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अखेर शरद पवार यांनाच यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. पण, आता पंतप्रधान मोदी यांच्या ऑफरमुळे वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या