मुंबई । Mumbai
वेस्ट इंडिजच्या जमिनीवर भारताचा तिरंगा दिमाखात उभारल्यानंतर टीम इंडियाचं (Team India) आज मायदेशी आगमन झालं आहे. टीम इंडियाचे आज राजधानी दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले.
त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत (Narendra Modi) कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल दीड तास चर्चा केली. या भेटीत सर्वच खेळाडूंशी मोदींनी वन टू वन संवाद साधला. तर, खेळाडूंच्या कुटुंबीयांसमवेतही फोटोशूट केलं.
हे देखील वाचा : T20 World Cup 2024: वर्ल्ड चँपियन बनताच ‘टीम इंडिया’ मालामाल, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी रक्कम
पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, आमच्या चॅम्पियन्सबरोबर एक उत्तम भेट! 7, LKM येथे विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली. यादरम्यान त्यांच्या स्पर्धेदरम्यानच्या अनुभवांवर संस्मरणीय असा एक संवाद साधला.
हे देखील वाचा : T20 World Cup 2024 : रोहित शर्मा-विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटला अलविदा
दरम्यान, टीम इंडियाची विजयी परेड नरिमन पॉइंट येथून सायंकाळी ५ वाजता काढण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनीही परेड मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याचवेळी सायंकाळी ७ वाजता वानखेडे स्टेडियमवर सत्कार समारंभ होणार आहे. यामध्ये बीसीसीआय खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफचा सन्मान करण्यात येणार आहे.