Tuesday, November 5, 2024
Homeक्रीडाT20 World Cup 2024 : रोहित शर्मा-विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटला अलविदा

T20 World Cup 2024 : रोहित शर्मा-विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटला अलविदा

अशी राहिली आहे दोघांची टी २० मधील कामगिरी

नवी दिल्ली | New Delhi

टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला (South Africa) ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ७ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेचा डाव २० षटकात ८ बाद १६९ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. भारताला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये हे दोघेही खेळतांना दिसणार आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : ICC T-20 World Cup-2024 : IND Vs SA : भारतीय संघ विश्वविजेता

यावेळी भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर माध्यमांशी बोलतांना रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी आताच्या सारखी चांगली वेळ नाही. हा माझा शेवटचा सामना होता.यंदाच्या टी २० वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी आतूर होतो. हा विजय शब्दात मांडणं कठीण आहे. मला हे हवं होतं आणि आम्ही करून दाखवले. त्यामुळे मला याचा खूप आनंद होत आहे. मी माझी कारकीर्द एन्जॉय केली. मी भारतीय संघासाठी माझ्या कारकिर्दीची सुरुवात याच फॉरमॅटमधून केली होती त्यामुळे मला हा कप जिंकायचाच होता, असे त्याने म्हटले.

हे देखील वाचा : T20 World Cup 2024: वर्ल्ड चँपियन बनताच ‘टीम इंडिया’ मालामाल, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी रक्कम

तर विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, “आता नव्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा टी २० वर्ल्ड कप होता. जे मिळवायचे होते ते मिळाले आहे. एक दिवस तुम्हाला वाटतं की तुम्ही धावा काढू शकत नाही आणि असं होतं. भगवान महान आहे. फक्त संधी, आताच नाही तर कधी नाही अशी स्थिती होती. भारतासाठी खेळण्याचा टी २० क्रिकेटमधील अखेरचा सामना होता. आम्हाला वर्ल्ड कप उंचावायचा होता, आम्ही तो उंचावला आहे. हे एक खुलं गुपित होतं, सामना हरलो असतो तरी निवृत्ती जाहीर करणार होतो,असे त्याने सांगितले.

रोहित शर्माची टी २० कारकीर्द

रोहित शर्माने भारतासाठी १५९ आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळले आहेत. यात ३२.०५ च्या सरासरीने त्याने १४०.८९ च्या स्ट्राइक रेटने ४२३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतके आणि ३२ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच रोहित शर्मा २००७ आणि २०२४ च्या टी २० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य आहे.

हे देखील वाचा : IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात महामुकाबला

विराट कोहलीची टी २० कारकीर्द

विराट कोहलीने भारतासाठी १२५ सामने खेळले आहेत. या १२५ सामन्यांच्या ११७ डावांमध्ये ४८.६९ च्या सरासरीने ४१८८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि ३८ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १२२ इतकी राहिली आहे. त्यासोबतच या काळात कोहलीने ३१ वेळा नाबाद राहतांना ३६९ चौकार आणि १२४ षटकारही खेचले आहेत. तसेच विराट कोहलीच्या टी-२० विश्वचषकातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांने टी-२० विश्वचषकात ३५ सामने खेळले असून १२९२ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी ५८.७२ राहिली असून स्ट्राइक रेट १२८.८१ इतका राहिला आहे. या कालावधीत त्याने १५ अर्धशतके झळकावत १११ चौकार आणि ३५ षटकार मारले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या