Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर माफी मागत म्हणाले, शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर माफी मागत म्हणाले, शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो…

मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून पालघर मधील वाढवण बंदराच्या भुमिपुजनाचा सोहळा पार पडला. यावेळी गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडले, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितली.

- Advertisement -

काय म्हणाले नरेंद्र मोदी?
भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली. “सिंधुदुर्गात जे झाले. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे ते असे ही म्हणाले, आमचे संस्कार वेगळे आहे. आम्ही ते लोक नाही, भारताचे सुपुत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करत असतात. त्यांच्यावर टीका करत असतात. सावरकर यांच्यावर नको त्या शब्दांत टीका करतात, पण माफी मागत नाही. कोर्टात जातात. तरी त्यांना पश्चाताप होत नाही’ मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठं नाही”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

जगातील सर्वात मोठे बंदर असणार
“आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे. विकसित महाराष्ट्रात विकसित भारताच्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच मागच्या १० वर्षात असो किंवा सरकारचा तिसरा कार्यकाळ असो. आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. महाष्ट्राजवळ विकासासाठी संसाधने आहेत. महाराष्ट्रात राज्याच्या तसेच देशाच्या विकासाची मोठी क्षमता आहे, त्यामुळेच आज वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या बंदरासाठी जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, या बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचे एक केंद्र बनेल”, हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असेल. देशच नाही तर जगातील सर्वात मोठे पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचे काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाजा लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचे किती मोठे केंद्र होईल”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या