Sunday, May 24, 2026
Homeक्राईमNashik Crime News: ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्सची कारवाई; चार लाखांचे एमडी हस्तगत

Nashik Crime News: ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्सची कारवाई; चार लाखांचे एमडी हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये विक्रीसाठी आणलेला तब्बल चार लाख रुपयांचा मेफेड्रोनचा (एमडी) साठा एएनटीएफ पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी एका संशयितास बेड्या ठोकल्या असून, आडगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश राजेंद्र ढाकणे (३१, रा. मोरया रो हाऊस, कोणार्क नगर, आडगाव) आणि कादिर शेख असे अमली पदाथविरोधी टास्क फोर्सने अटक केलेल्या संशयित पेडलरांची नावे आहेत. कोणार्क नगर परिसरातील बालाजीनगर येथील मोरया रो हाऊस येथे एमडी ड्रग्ज तस्करीसाठी आणल्याची माहिती फोर्सला मिळाली होती. त्यानुसार टास्क फोर्सच्या पथकाने सापळा रचून ढाकणे यास पकडले. ढाकणेने मुंबईतील जोगेश्वरी येथील कादिर शेखकडून चार लाख नऊ हजार रूपयांचे एमडी ड्रग्ज मिळविले असे तपासात पुढे येत आहे.

- Advertisement -

Nashik Crime News: लष्करात ड्रग्जचा पुरवठा ? देवळाली कॅम्पला २४ लाखांचे ‘ॲम्फेटामाइन’ जप्त; तिघे एजंट अटक

टास्क फोर्सचे अंमलदार भास्कर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एनडीपीएस टास्क फोर्स करीत आहेत. शहरात सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने मुंबईसह इतर ठिकाणाहून एमडी ड्रग्ज दाखल होते. पोलिसांकडून सातत्याने कारवाई होते. मात्र, तस्करीला पूर्ण आळा बसू शकलेला नाही. एमडी खरेदीदार कोण, किती दिवसांपासून तस्करीचे काम सुरू आहे, आदी प्रश्नाची उत्तरे टास्क फोर्समार्फत शोधण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आचारसंहिता लागू नसल्याने होणार कर्मचार्‍यांच्या बदल्या!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे तात्पुरत्या स्थगित केलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांना पुन्हा एकदा संमती मिळाल्याने सोमवारी (दि. 25) या बदल्या होत आहेत. दरम्यान,...