Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशतब्बल ७० वर्षांनी भारतात आले चित्ते, पंतप्रधानांनी ८ चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं

तब्बल ७० वर्षांनी भारतात आले चित्ते, पंतप्रधानांनी ८ चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं

दिल्ली | Delhi

तब्बल ७० वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले.

- Advertisement -

आठ चित्त्यांमध्ये ४ मादी आणि ३ नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं.

१९५२ मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचे घोषित केल्यानंतर सात दशकांनंतर भारतामध्ये त्यांच्या पुन: परिचयासाठी दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले गेले आहेत. भारतातून नामशेष झालेली ही प्रजाती पुन्हा एकदा देशात आल्यामुळं सध्या सर्वत्र आणि विशेष म्हणजे प्राणीप्रेमींमध्ये कमालीचं कुतूहल पाहायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या