Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi Speech : एक देश, एक निवडणूक ते महिलांची कामगिरी; मोदींच्या...

PM Modi Speech : एक देश, एक निवडणूक ते महिलांची कामगिरी; मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मोदींनी आज जवळपास ९४ मिनिटांपेक्षा जास्त वेळ भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात तरूणांचा रोजगार, महिलांचा विकास, सेक्यूलर सिव्हील कोड'(धर्मनिरपेक्ष नागरी संहिता) यासह विविध मुद्दे मांडले. त्यातील महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत.

हे देखील वाचा : संपादकीय : १५ ऑगस्ट २०२४ – बहिरेपण टाळण्याचे सज्ञान येईल का?

एक देश, एक निवडणूकीसाठी देशाला पुढे यावे लागेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात एक देश, एक निवडणूकीसाठी देशाला पुढे यावे लागेल, असे देखील म्हटले. भारताच्या प्रगतीसाठी एक राष्ट्र, एक निवडणूक हे स्वप्न साकार करायचे आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढे या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.तसेच राजकारणातील घराणेशाही नष्ट करणे गरजेचे असून देशभरातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसेलेल्या एक लाख तरुण-तरुणींना पुढे यावे आणि राजकारणात सक्रीय व्हावे. त्यांनी कोणत्याही पक्षात जावे पण राजकारणात यावे, असेही मोदींनी म्हटले.

१५०० पेक्षा अधिक कायदे रद्द केले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात “देशवासीयांच्या हितासाठी १५०० पेक्षा अधिक कायदे रद्द करण्यात आले. छोट्या छोट्या चुकांसाठी तुरुंगात टाकणारे कायदेही रद्द केले. फौजदारी कायदा बदलला असल्याचे म्हटले. तसेच देशवासीयांनी कर्तव्यभाव बाळगायला हवा. सरकारपासून नागरिकांपर्यंत सगळ्यांचे कर्तव्य आहेत. १४० कोटी देशवासीयांचेही कर्तव्य आहेत. आपण आपली कर्तव्य पाळली, तर अधिकारांचे संरक्षण आपोआप होते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज पडत नाही, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Independence Day 2024 : वैद्यकीय शिक्षणासंदर्भात PM मोदींची महत्वपूर्ण घोषणा

प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली ताकद दाखवून दिली

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.महिला आधारित विकासाच्या मॉडेलवर काम केले आहे. इनोव्हेशन आणि उद्योजकतेसह प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला प्रगती करत आहेत. महिला फक्त सहभागच नाहीत, तर नेतृत्व देखील करत आहेत. आपल्या लष्कर, नौदल, हवाई दल आणि अंतराळ क्षेत्रामध्ये महिलांची ताकद दिसून येत असून १० कोटी महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत असल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदींचा घराणेशाहीवर प्रहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात घराणेशाहीवरही प्रहार केले. राजकारणातील घराणेशाही नष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कमीत कमी एक लाख तरुण-तरुणींनी पुढे यावे. यामुळे राजकारणातील घराणेशाहीला आळा बसेल. या तरुणांनी कोणत्याही पक्षात जावे. कोणतीही निवडणूक लढवावी, असेही मोदी यांनी आवाहन केले.

हे देखील वाचा : Independence Day 2024 : राष्ट्रपतींसह, PM मोदींनी जनतेला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

पंतप्रधान मोदींचे राज्य सरकारांना आवाहन

जगभरातल्या अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करू इच्छित आहेत. माझं राज्य सरकारांना आवाहन आहे की ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी धोरणं ठरवा. सर्व राज्यांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे नेण्यासाठी स्पर्धा व्हायला हवी. त्या राज्यात गुंतवणूक गेली तर त्या राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जागतिक गरजांनुसार राज्यांनी धोरणांमध्ये बदल करायला हवा. जमीनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. राज्य सराकर जेवढे प्रयत्न करेल, तेवढे गुंतवणूकदार कधीच परत जाणार नाहीत. फक्त भारत सरकारचं हे काम नाही. राज्य सराकरांनीही काम करायला हवे. तो प्रकल्प त्या राज्यात लागणार आहे. राज्य सरकारांनी आपल्या जुन्या सवयी बदलून स्पष्ट धोरणानिशी पुढे यायला हवे असे मोदी म्हणाले.

आगामी ५ वर्षांमध्ये ७५ हजार वैद्यकीय शिक्षणाच्या जागा निर्माण करणार

देशात आगामी ५ वर्षांमध्ये ७५ हजार वैद्यकीय शिक्षणाच्या जागा निर्माण करण्याची घोषणा यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली. त्याचबरोबर, राजकारणातील घराणेशाहीला छेद देण्यासाठी देशभरातून १ लाख तरुणांनी पुढे येऊन त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं, जेणेकरून नवीन पिढी राजकारणात येईल व त्याअनुषंगाने नवे विचारही राजकीय व्यवस्थेत दाखल होतील, अशी भूमिका मोदींनी मांडली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या