नवी दिल्ली | New Delhi
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवी दिल्लीतील (New Delhi) डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात एक विशेष टपाल तिकिट आणि एक नाणे जारी केले. यावेळी त्यांनी संबोधित करताना स्वातंत्र्यानंतर संघाला अनेकदा चिरडण्याचे प्रयत्न झाले पण संघ वटवृक्षासारखा खंबीरपणे उभा राहिला असं म्हटले. तसेच स्वयंसेवकांनी कोविड-१९ मध्ये देशाला मदत केली असे देखील मोदींनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, “आज महानवमी आहे, देवी सिद्धीदात्रीचा दिवस आहे. मी सर्व देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. उद्या विजयादशमीच महापर्व आहे. अन्यायावर न्यायाचा विजय आहे. असत्यावर सत्याचा विजय, अंधकारावर प्रकाशाचा विजय. विजयादशमी (Vijayadashmi) हा भारतीय संस्कृती विचार आणि कलजयचा उदघोष आहे. अशा महान पर्वावर १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होणे हा योगायोग नव्हता. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचे हे पुनरुज्जीवन होते. ज्यामध्ये राष्ट्रीय चेतना वेळोवेळी नवीन अवतारांमध्ये युगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रकट होते. या युगात, संघ हा त्या शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार आहे,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, “संघाच्या १०० व्या गौरव यात्रेत भारत सरकारने विशेष टपाल तिकीट आणि नाणी जारी केली आहेत. भारतीय मुद्रेवर भारत मातेचा फोटो संभवत: स्वतंत्र भारताच्या (India) इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल. १०० वर्षाच्या या गौरव यात्रेत सरकारने विशेष टपाल तिकीट आणि शिक्का जारी केला. १०० रुपयाच्या या नाण्यावर एकाबाजूला राष्ट्रीय चिन्ह आणि दुसऱ्याबजूला भारत मातेचा फोटो आणि समर्पण भावनेने नमन करताना स्वयंसेवक दिसतात. या शिक्क्यावर संघाचं बोधवाक्य लिहिले आहे. आज विशेष स्मृती टपाल तिकीट जारी केलं त्याचं महत्व आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं किती महत्व असतं. १९६३ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुद्धा परेडमध्ये सहभागी झाले होते . या तिकीटामध्ये त्याच ऐतिहासिक क्षणांची स्मृती आहे. संघाचे जे स्वयंसेवक देशसेवेमध्ये आहेत, त्यांची झलक टपाल तिकीटात दिसते. मी यासाठी देशवासियांना शुभेच्छा देतो” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर संघाला चिरडण्याचा प्रयत्न
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “संघाबद्दल असं म्हटलं जातं की यात सामान्य लोक मिळून असामान्य काम करतात. संघाची शाखा अशी प्रेरणाभूमी आहे, जिथे अहमकडून वहमकडे प्रवास सुरु होतो. संघाच्या शाखेत शारीरिक आणि मानसिक विकास होतो. संघासाठी देश पहिला आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत संघ सहभागी झालेला. १९४२ साली इंग्रजांविरोधात आंदोलनात संघाच्या स्वयंसेवकांनी अत्याचार सहन केला. संघाने खूप बलिदानं दिली आहेत. संघाचं लक्ष्य एक भारत, श्रेष्ठ भारत आहे, संघावर हल्ले सुद्धा झाले. संघाविरुद्ध कारस्थानं झाली. स्वातंत्र्यानंतर संघाला चिरडण्याचा प्रयत्न झाला,” असेही त्यांनी म्हटले.




