Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi Speech : जळगावमध्ये महिलांचा महासागर - पंतप्रधान मोदी

PM Modi Speech : जळगावमध्ये महिलांचा महासागर – पंतप्रधान मोदी

जळगाव | Jalgaon

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज रविवारी जळगावात (Jalgaon) ‘लखपती दीदीं’चा (Lakhpati Didi) मेळावा पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील ३० व देशातील ५० लखपती दिदींचे अनुभव,अडचणी ऐकून घेतले. त्यांनतर मोदींनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, उद्या श्रीकृष्ण जयंती आहे त्यामुळे मी तुम्हाला आजच शुभेच्छा देतो, असे म्हणत त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.आजची गर्दी पाहून याठिकाणी महिलांचा महासागर उसळल्याचे दिसत आहे. तसेच नेपाळमधील दुर्घनेत जळगाव जिल्ह्यातील मृत्युमुखी पडलेल्या सर्वांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा भारत सरकारने तात्काळ नेपाळ सरकारशी संपर्क साधला. त्यानंतर आपण मंत्री रक्षा खडसे यांना त्वरित नेपाळला जाण्यास सांगितले. यानंतर दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांचे मृतदेह आपण विशेष विमानाने परत आणले. जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू असून जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. तसेच सर्व पीडितांना केंद्र आणि राज्य सरकारकडून संपूर्ण मदत केली जाईल,असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा :  Eknath Khadse : निमंत्रण मिळाले तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही; खडसे असं का म्हणाले?

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या सगळ्यांकडे पाहून मला मला महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन होत असते. महाराष्ट्राचे संस्कार भारत नाही तर जगभरात पसरलेले आहे. मी कालच परदेश दौऱ्यावरून परत आलो आहे. मी युरोपच्या देशात पोलंड येथे गेलो होतो. तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन झाले. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप सन्मान करतात. इथे बसून तुम्ही याबाबतची कल्पनाही करू शकत नाही. तेथील राजधानीत एक कोल्हापूर मेमोरियल आहे. पोलंडच्या लोकांनी मेमोरियल कोल्हापुरातील लोकांची सेवा आणि सत्काराच्या भावनेने सन्मान देण्यासाठी बनवलेले आहे. काही लोकांना माहिती असेल की, दुसऱ्या विश्वयुद्धाच्या दरम्यान पोलंडच्या हजारो माता आणि बालकांना कोल्हापूरच्या राज परिवाराने शरण दिले होते. जेव्हा महाराष्ट्राचा सन्मान कथा ऐकत होतो तेव्हा माझा माथा गौरावपणे उंच झाला, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

गेल्या दोन महिन्यात ११ लाख लखपती दीदी

आज लखपती दीदींचे जळगावात महासंमेलन होत आहे. गेल्या दोन महिन्यात ११ लाख लखपती दीदी बनल्या आहेत. आज देशभरातील सखी मंडळांसाठी ६ हजार कोटींहून अधिक रुपये जारी केले आहेत. या लखपती दीदींच्या माध्यमातून लाखो महिलांना मदत मिळणार आहे. माझ्या सर्व महिलांना शुभेच्छा आहे. मी लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यामध्ये आलो होतो. तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचे आहे, असे म्हटले होते. लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाई वाढवण्याचे अभियान नाही, पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचे महाअभियान आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

हे देखील वाचा :  Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

महिलांत मी जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची छाप पाहतो

आमचे जळगाव वारकरी परंपरांचे तीर्थ आहे, मुक्ताईची ही भूमी आहे. बहिणाबाईची कविता प्रेरित करत आली आहे. मातृशक्तीचे योगदान अप्रतिम आहे. शिवाजी महाराजांना दिशा देण्याचे काम माँ जिजाऊने केले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण दिले. समाज आणि राष्ट्रासाठी येथील मातांनी योगदान दिले. महाराष्ट्रामधील बहिणी किती चांगले काम करत आहेत. तुमच्यात मी जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची छाप पाहतो, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

आतापर्यंतचे सर्व सभांचे रेकॉर्ड आजच्या या लखपती दीदी संमेलनाने मोडीत काढले – मुख्यमंत्री

आतापर्यंतचे सर्व सभांचे रेकॉर्ड आजच्या या लखपती दीदी संमेलनाने मोडीत काढले आहेत.आजचा महिलांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे. याठिकाणी जमलेल्या बहिणी सोन्यापेक्षा चांगल्या आहेत. पंतप्रधान मोदी या सोहळ्यासाठी आल्याने आजचा दिवस द्विगुणीत करणारा आहे. सरकारच्या योजनांमुळे राज्यातील महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद फुलला आहे. मागील १० वर्षांत अनेक महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. मोदींनी लोकसभेत पहिले बिल नारीवंदन पास केले आहे. आज महिलांना ५ हजार कोटींचे अर्थसाह्य केले जाणार आहेत. ३ कोटी लखपती दीदींपैकी महाराष्ट्रातील २५ लाख महिलांना याचा लाभ होणार आहे. महिला अनेक भागात पुढाकार घेऊन छोटे मोठे उद्योग सुरू करतात. आम्ही मोदींपासून प्ररित होत राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करत आहोत. मागील दोन वर्षांत केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या योजनांना मंजुरी दिली असून भरघोस निधी दिला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे म्हणाले.

हे देखील वाचा :  Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पुढील ३-४ दिवस मुसळधार! कोणत्या भागात, कोणता अलर्ट? जाणून घ्या

नारपार योजनेच्या टेंडरला आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल – फडणवीस

या कार्यक्रमावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील नारपार योजनेला आमच्या सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांनतर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेच्या टेंडरला मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच लखपती दीदींचा संमेलनात जळगावच्या महिलांनी संख्येचा रेकॉर्ड केले आहे. महिला देश विकसित करू शकतात. आता पुढे महिलांना देशाचा कारभार देण्यात येणार आहे,असेही फडणवीसानी म्हटले.

मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात – अजित पवार

या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं स्वागत केल्याचं पाहिलं नव्हतं. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे, असे अजित पवार म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या