नागपूर | Nagpur
आज गुढीपाडव्याच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते काही वेळापूर्वीच नागपूरात (Nagpur) दाखल झाले आहेत. त्यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी नागपुरात दाखल होताच रेशीमबाग येथील डॉ. केशव हेडगेवार (Dr. Keshav Hedgewar) स्मृती भवन परिसरात भेट देऊन स्मृति मंदिराला अभिवादन केले आहे.यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर आगमनापूर्वीच संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) रेशीमबागेत दाखल झाले होते. संघाच्या परंपरेनुसार येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागत स्थानिक पदाधिकारी करतात. त्या नात्याने आज हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून भैय्याजी जोशी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. डॉ.हेडगेवार यांच्या स्मृति मंदिराला अभिवादन केल्यानंतर मोदी दीक्षाभूमीच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण शहरात स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच शहरात ५ हजार पोलिसांचा (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जागोजागी ‘मोदी है तो मुनकीन है एक है तो सेफ है, मोदी है तो मुनकीन है’ अशा पद्धतीचे फलक (Banner) लावण्यात आले असून हे फलक लक्ष वेधून घेत आहेत.