Wednesday, June 26, 2024
Homeब्रेकिंग न्यूजडॉ.भारती पवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' तारखेला घेणार सभा

डॉ.भारती पवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला घेणार सभा

नाशिक | Nashik

- Advertisement -

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे. यामध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा होत आहेत. तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवारांसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा पार पडत आहेत.

या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभेतील (Dindori Loksabha) महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या १० मे रोजी पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे प्रतिकूल राजकीय परिस्थितीशी सामना करणाऱ्या डॉ. भारती पवार यांना मोदींच्या सभेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दिंडोरी लोकसभेत बहुतांश कांदा (Onion) उत्पादक शेतकरी असून केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) नाराजीचा सूर आहे.त्यामुळे याचा सामना डॉ. पवार यांना प्रचार करताना देखील करावा लागत आहे. यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची या मतदारसंघात सभा होत असल्याने डॉ. भारती पवारांसाठी हा बुस्टर डोस ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar Group) गटाने भास्कर भगरे (Bhasakr Bhagre) यांना उमेदवारी दिली असून त्यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आता डॉ. भारती पवार या येत्या गुरुवारी (दि.२ मे) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याआधी पंतप्रधान मोदींची सभा झाल्यास अनुकूल वातावरण तयार होऊन प्रचारासाठी आघाडी मिळेल, असा प्रयत्न डॉ. पवार यांचा असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या