Friday, April 25, 2025
Homeक्राईमविष प्राशनाने अल्पवयीन मुलीचा मृत्यू

विष प्राशनाने अल्पवयीन मुलीचा मृत्यू

नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर मधील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील एका अल्पवयीन मुलीचा (वय 15) विष प्राशनाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रूपाली योगेश चव्हाण (रा. बुर्‍हाणनगर) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

रूपाली चव्हाण हिने 31 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजता विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर तिला तातडीने खासगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे रूपालीवर उपचार सुरू असताना तिची प्रकृती अधिकच बिघडत गेली. अखेर 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:15 वाजता तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार एम. टी. विधाते करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रूपालीने विष का घेतले? तिच्या मृत्यूमागील नेमके कारण काय? याचा तपास पोलीस करत असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...