Saturday, April 26, 2025
Homeनगरअवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी पकडला

अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी पकडला

चितळी-दिघी रस्त्यावर कारवाई, दोन जणांना अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन करून नेणारा एक डंपर श्रीरामपूर तालुक्यातील दिघी-चितळी रस्त्यावर तालुका पोलिसांनी पकडला. या कारवाईत पोलिसांनी चार ब्रास वाळू आणि एक डंपर असा एकूण 4 लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करून दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी वाळू तस्करांविरोधात कारवाया सुरु केल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

परंतू सामान्य नागरिकांतून याचे कौतूक होत आहे. काल दुपारी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या पोलीस पथकाने चितळी दिघी रोडवर बेकायदेशीररित्या टाटा कंपनीचा लाल रंगाचा डंपर गोदावरी नदीपात्रातून वाळू घेऊन जात असताना अडवला. पोलिसांनी डंपर चालक नंदू कोठुळे व डंपरचा मालक (नाव माहित नाही) या दोघांना ताब्यात घेऊन डंपर पोलीस ठाण्यात जमा केला. यात पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू व टाटा कंपनीचा डंपर किंमत 4 लाख 50 हजार असा एकूण 4 लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास सुभाष आंधळे यांनी फिर्याद दाखल केली असून भा. द. वि. कलम 379, 34 व पर्यावरण कायदा कलम 3/15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : मनपा सेवक, एजंटाच्या घरावर ईडीचे छापे; बनावट जन्मदाखल्याप्रकरणी...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदात्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात (Case) आज ईडीच्या (ED) पथकाने शहरात महानगरपालिकेत (NMC) जन्ममृत्यू विभागात...