Sunday, April 27, 2025
Homeनगरअंमलदाराने पोलीस ठाण्यातच घेतला विषारी पदार्थ

अंमलदाराने पोलीस ठाण्यातच घेतला विषारी पदार्थ

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे आवारातच पोलीस अंमलदार प्रवीण जगताप (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदरची घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली असून जगताप यांना उपचारासाठी सुरूवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

अंमलदार जगताप भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. त्यांना शनिवारी रात्री ड्युटी असल्याने ते पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्यात असतानाच त्यांनी अचानक विषारी पदार्थाचे सेवन केले. यामुळे एकच गोंधळ उडाला. सदरचा प्रकार ठाण्यात उपस्थित असलेल्या इतर पोलीस अंमलदारांच्या लक्षात येताच त्यांनी जगताप यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी रुग्णालयात धाव घेतली.

जगताप यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्थिक व्यवहारातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भात कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजगुरू यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...