
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
फिलिपाईन्सच्या दक्षिण भागात एका बेटाजवळ मोठी बोट दुर्घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.
कोस्ट गार्ड अधिकार्यांनी माहिती दिली की, ही एक ‘इंटर-आयलंड कार्गो आणि पॅसेंजर फेरी’ होती, जी झांबोआंगा या बंदर शहरातून सुलू प्रांतातील जोलो बेटाकडे जात होती. यामध्ये ३३२ प्रवासी आणि २७ क्रू मेंबर्स (कर्मचारी) होते.मध्यरात्री या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती बुडाली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गणपती बाप्पा मोरया! प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचेच लक्ष
कोस्टल गार्डने दिलेल्या माहितीनुसार हे जहाज प्रवासासाठी निघाल्यानंतर साधारण ४ तासांनी सोमवारी मध्यरात्री एक वाजून 50 मिनिटांनी या जहाजाने संकटात असल्याचे सिग्नल दिले. त्यानंतर लगेच बचाव पथके पाठवण्यात आली कोस्ट गार्ड कमांडर रोमेल दुआ यांनी सांगितले की, बालुक द्वीप गावापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर ही बोट बुडाली. वाचलेल्या प्रवाशांना याच बेटावर नेण्यात आलं आहे. ३१६ लोकांना रेस्क्यू करून बेटावर पोहोचवण्यात आले, त्यापैकी १५ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून २८ जण अजूनही बेपत्ता आहेत.
बोट नेमकी का बुडाली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे दुआ यांनी स्पष्ट केले. बंदरातून निघण्यापूर्वी कोस्ट गार्डने या बोटीला परवानगी दिली होती आणि ओव्हरलोडिंगचे कोणतेही संकेत नव्हते, असेही त्यांनी सांगितले.




