नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विल्हाेळी शिवारातील (Vilholi Area) संशयास्पद गाेदामांत (दि. २७) नाशिक तालुका पाेलीस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा (Raid) टाकून २२ लाख रुपयांचे बाेगस खते (Bogus Fertilizer) हस्तगत केली आहेत. याबाबत संशयित गोरख उर्फ अंकुश पवार (रा. अंबरनाथ) व प्रकाश मोरे (रा. नाशिक) यांच्यावर खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच भारतीय न्याय संहीता २०२३ अन्वये तालुका पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : सिटीलिंकच्या चालकांविरोधात मेस्मा कायद्याअंतर्गत नाशिकरोड व आडगावला गुन्हे
राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील, नाशिकचे विभागीय कृषी संचालक रविशंकर चलवदे, जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथका विल्होळी शिवारातील दोन गाळ्यांमध्ये अवैधरीत्या विनापरवाना खते उत्पादन केले जात असल्याच्या माहिती मिळाली हाेती. त्यानुसार भरारी पथकाने (Squad) तालुक्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्याशी समन्वय साधून कारवाईबाबत विनंती केली.
हे देखील वाचा : Nashik Accident News : स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात युवक ठार
त्यानुसार अंमलदार प्रविण दोबाडे, महेश आव्हाड, विक्रम कडाळे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डाॅ. जगन सुर्यवंशी, माेहिम अधिकारी अभिजित जमधडे, कृषीच्या भरारी पथकातील सदस्य जितेंद्र पानपाटील, तालुका कृषी अधिकारी भटू पाटील, कृषी पर्यवेक्षक संजय सानप, राहुल शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. दरम्यान, अवैध व विनापरवाना निकृष्ट निविष्ठा उत्पादन करुन शेतकरी व शासनाची फसवणूक (Fraud) करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा