Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Crime News : वाॅचमनला धमकावत टाकला दराेडा; गस्तीदरम्यान पाच जणांना अटक

Nashik Crime News : वाॅचमनला धमकावत टाकला दराेडा; गस्तीदरम्यान पाच जणांना अटक

एक सराईत फरार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

निर्माणाधीन साेसायटीची सुरक्षा करणाऱ्या वाॅचमनसह त्याच्या साथीदारास चाकूचा धाक दाखवून साेसायटीतील जलपरी व साहित्यावर दराेडा (Robbery) टाकणाऱ्या सहापैकी पाच दराेडेखाेरांना उपनगरच्या गस्तीपथकाने अटक (Arrested) केली आहे. त्यांच्याकडून दराेड्याचा एक गुन्हा उघड झाला असून अंधाराचा फायदा घेत सहावा संशयित दराेडेखाेर पसार हाेण्यात यशस्वी झाला आहे. संशयितांकडून (Suspected) दराेड्याचे साहित्य, महागडी कार व चाेरीचा मुुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

हे देखील वाचा : Maharashtra Governor : सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; रमेश बैस यांची उचलबांगडी

याबाबत अधिक माहिती अशी की, करण दयादास सोनवाणी(वय २०, रा. मंगलमूर्तीनगर, मोरया परमिटच्या समोर, नारायण बापू नगर, जेलरोड), वैभव बाबाजी पाटेकर (वय २०, रा. नर्मदा सोसायटी, होली फ्लॉवर स्कुलच्यामागे, लोखंडेमळा, नाशिक रोड), पुष्कर गुलाब उन्हवणे, (वय २०), धीरजकुमार नरेश प्रसाद (वय २०), राहुल अनुप कुमार (वय २० तिघे रा. खर्जुळ मळा, टाकळी रोड, नाशिक) अशी पाच संशयित दराेडेखाेरांची नावे आहेत. तर, त्यांचा तडिपार मित्र सचिन उर्फ घाेड्या मधुकर ताेरवणे (वय २९, रा. सिद्धेश्वरनगर, सायखेडा राेड) असे पळून गेलेल्या संशयिताचे नाव आहे. 

हे देखील वाचा : Nashik Crime News : गाेळीबार करणारा सराईत अटकेत

खांडरे मळ्यातील साेसायटीत घडलेल्या दराेड्याचा गुन्हा समाेर आल्यावर झाेन दाेनच्या पाेलीस उपायुक्त माेनिका राऊत, नाशिकराेड विभागाचे सहायक आयुक्त सचिन बारी, उपनगरचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पाेलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत शिरसाठ यांच्यासह तपास पथक दाखल झाले. त्यांनी पथकास दराेडेखाेरांचा शाेध घेऊन अटक करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार उपनगर गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे (दि.२६) हद्दीत रात्रगस्त करत असतांना त्यांना टाकळी राेडवरील समतानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पोतदार स्कूलच्या मागील बांधकाम साईटच्या बाजूला काळया रंगाची होडा सिटी कारमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या. तेव्हा पोलीस व्हॅन कारच्या समोर नेताच कारमधील संशयित पळू लागले.

हे देखील वाचा : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुमो गाडीचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

त्यानंतर पोलिसांनी (Police) पाठलाग करून पाच जणांना पकडले. त्यांच्या झडतीतून कार, चाकु, मिरची पूड, नायलॉन दोरी, हातोडी, स्क्रु ड्रायव्हर, कारच्या डिक्कीत दोन जलपरी मिळून आल्या. या जलपरी खांडरे मळ्यात टाकलेल्या दराेड्यातील असल्याची कबुली संशयितांनी दिली. दरम्यान, दराेडा टाकून पुन्हा दुसऱ्या दिवशी दराेड्याच्या तयारी असलेली ही टाेळी पाेलिसांच्या हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल हाेण्यास मदत हाेणार आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक सचिन चौधरी, उपनिरीक्षक विशाल सपकाळे, सुरेश गवळी, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख आदींनी केली. 

असा टाकला दराेडा

पुणे महामार्गावरील खांडरे मळ्यात सुरू असलेल्या बंगल्यावर वॉचमन पाचुराम रामतीरथ अरजन उर्फ आकाश व त्याच्या मित्रास (दि. २५) रात्री अडीच वाजता अनाेळखी पाच- सहा दराेडेखाेरांनी आत येत चाकूचा धाक दाखविला. आकाश हा कुलदीप लोकवाणी यांच्या बंगल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी वॉचमन आहे. याचवेळू दराेडेखाेरांनी चाकूचा धाक दाखवून येथीलच लोकवानी, अमोल सातपुते, दिनेश खांडरे यांच्या बंगल्यातील तीन बोअरिंग मोटार, राजू मोरे यांच्या घरातील लिफ्ट फिटींगचे १ लाख १० हजारांचे साहित्य, माेटार व लिफ्टचे साहित्य दराेडा टाकून जबरीने चोरून नेले हाेते.

मुद्दे

१) करण सोनवाणी याच्या मालकीची हाेन्डा सिटी कार जप्त

२) पाचही संशयितांना सोमवार(दि.२९) पर्यंत पोलीस कोठडी

३) अटकेतील परप्रांतीय संशयित वेठबिगार

४) वैभव पाटेकर घोड्या तोरवणे हे जिवलग मित्र

५) दरोडा टाकण्यापूर्वी दुसरीकडे जलपरीची चोरी

६) चोरलेल्या जलपरींची भंगारात व स्वस्तात विक्री

७) घोड्यावर यापूर्वी झालीय एमपीडीएची कारवाई

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या