Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याDarshana Pawar : दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; राहुल हांडोरेला मुंबईतून अटक

Darshana Pawar : दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; राहुल हांडोरेला मुंबईतून अटक

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवत अधिकारी झालेल्या दर्शना पवारचा (Darshana Pawar) राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह (Dead Body) आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर तिच्या शवविच्छेदन अहवालात तिची हत्या (Murder) झाल्याचे समोर आले होते.

- Advertisement -

दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरेसोबत १८ जूनला राजगडावर (Rajgad) फिरायला गेली होती. मात्र जवळील हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये राहुल एकटाच राजगडावरुन खाली उतरताना दिसला होता. त्या दिवसापासून राहुल हांडोरे गायब होता. यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम (ATM) सेंटरवरुन राहुल हांडोरे याने एटीएम कार्डवरुन पैसे काढले होते.

Nashik Accident News : कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, थरारक Video आला समोर

यानंतर रविवारी रात्री उशिरा त्याने त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. त्यावेळी त्याच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता ते कोलकाता येथे होते. राहुल हांडोरेच्या या संशयास्पद हालचालींवरून दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याचा संशय पोलिसांना (Police) होता. त्यानुसार पुणे पोलिसांनी त्याच्या तपासासाठी ५ पथके रवाना केली होती.

त्यानंतर आता पुणे पोलिसांनी संशयित राहुल हांडोरेला मुंबईतून (Mumbai) अटक केली आहे. दर्शनाशी विवाह करण्याची राहुलची इच्छा होती. मात्र, एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचा विवाह दुसऱ्या एका मुलासोबत ठरवला होता. त्यावेळी राहुलने ‘मला वेळ द्या ‘अशी विनंती तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला. त्यामुळे राहुल हांडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. यानंतर आता चार दिवसांनी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

साताऱ्यात राडा; उदयनराजे, शिवेंद्रराजेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या