नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एप्रिल महिन्यात सामनगाव राेडवरील चाडेगाव शिवारात (Chadegaon Area) वर्गणीच्या हिशाेबाचा वाद घालत २० हजार रुपये खंडणी मागून नातलग भावावर गाेळीबार (Firing) करुन पसार झालेला मुख्य सूत्रधार सचिन मानकर याला शहर गुंडा विराेधी पथकाने गजाआड केले आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून मानकर पसार झाला हाेता. त्याच्यावर सात ते आठ गंभीर स्वरुपाचे गुन्हे नाेंद आहेत. त्याचा ताबा नाशिकराेड पाेलिसांकडे (Nashik Road Police) देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : सिटिलिंक बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन आनंदा मानकर(वय ३९, रा. मानकर मळा, चाडेगाव) असे संशयिताचे नाव असून चाडेगाव येथे ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त एप्रिल महिन्यात गावात नियोजनासंदर्भात वर्गणी गोळा करण्यासाठीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, हरिनाम सप्ताह सुरू असल्याने ही बैठक रद्द झाली. त्यानंतर गावातील संशयित सचिन मानकर यांच्यासह चार-पाच संशयित (Suspect) व ज्ञानेश्वर बंडु मानकर हे सोबत एकत्रितपणे हॉटेलमध्ये गेले हाेते.
हे देखील वाचा : Nashik Crime News : प्रेमप्रकरणास नकार दिल्याने पतीच्या मित्राने केला विनयभंग
त्यानंतर सिद्धीनाथ हॉटेलच्यापुढे नाल्याच्याजवळ त्यांची यात्रोत्सवाबाबत चर्चा सुरु असताना मागील वर्गणीचे पैसे ज्ञानेश्वर उर्फ बंडु मानकर याच्याकडे जमा होते. याबाबत सचिन मानकरने त्याला विचारणा केली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. याचा राग आल्याने सचिन मानकर याने गावठी पिस्तुलातून ज्ञानेश्व मानकर या नातलग भावावर दाेन राऊंड फायर केले हाेते. त्यात ताे जखमी (Injured) झाला हाेता. यानंतर मानकर पसार हाेता.
हे देखील वाचा : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुमो गाडीचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
दरम्यान, त्याचा शाेध सुरु असताना त्याची माहिती गुंडा विराेधी पथकास मिळाली. त्यांनी ही माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना कळविली. त्यांच्या सूचनेने पथकाचे प्रभारी व सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर माेहिते, उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, अंंमलदार विजय सूर्यवंशी आदींनी शुक्रवारी(दि. २६) पाथर्डी ते वडनेर राेडवरील वालदेवी हाॅटेलजवळ सापळा रचून मानकरला ताब्यात घेतले.
हे देखील वाचा : अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश
नेहमी गाडीत झाेपायचा
फायरिंग केल्यावर मानकर हा कार घेऊन पसार झाला. ताे यानंतर त्र्यंबक, इगतपुरी व इतर भागात तात्पुरते वास्तव्य करत हाेता. ओळखीतील मित्रांकडून पैसे मागवून जेवणाची व गाडीच्या इंधनाची व्यवस्था करत हाेता. तर, पाेलीस पकडतील या धाकाने ताे अनेक दिवसांपासून कारमध्येच झाेपून रात्र काढत हाेता. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेला कट्टा अद्याप हस्तगत झाला नसून ताे फेकून दिल्याची कबुली मानकर याने पाेलिसांना दिली आहे. पुढील तपास नाशिकराेड पाेलीस करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा