Saturday, May 18, 2024
Homeनाशिकज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या दोघा भामट्यांना ५ महिन्यांनंतर पोलीसांनी केले जेरबंद

ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या दोघा भामट्यांना ५ महिन्यांनंतर पोलीसांनी केले जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बंदुकीचा धाक (Fear Gun) दाखवून शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल ६६ लाख रुपये लुटून तसेच कार घेऊन पळून गेलेल्या दोघा भामट्यांना पोलिसांनी (Police) ५ महिन्यानंतर जेरबंद केले आहे. गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, युवराज मोहन शिंदे (वय ३७ रा. सातपुर) व देवीदास मोहन शिंदे (वय २६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे असून ते गत पाच महिन्यापासून फरार होते. या दोघा संशयितांकडून पोलिसांना लुटीचे ५३ लाख रुपये रोख तसेच वोल्स वॅगन कार व मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले आहे.

Nashik : ऑनलाईन गेमच्या माध्यमातून २७ लाखांची फसवणूक; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

१५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळच्या वेळी आंबेडकर चौक, होलाराम कॉलनी येथे ही घटना घडली होती. यानंतर ज्येष्ठ नागरिक कन्हैय्यालाल तेजसदास मनवानी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन या दोघा भामट्यांचा शोध सुरू होता. मनवानी यांचा कार चालक देवीदास मोहन शिंदे याने व कारमध्ये बसलेला त्याचा साथीदार यांनी आपसात संगनमत करुन मनवानी यांच्या छातीला रिव्हॉल्व्हर लावून त्यांच्याकडील ६६ लाख ५० हजार रुपये रोख असलेली कापडी पिशवी व मारुती सुझुकी कंपनीची कार (एमएच १५ जीएफ ९५६७) बळजबरीने चोरी करुन पळून गेले होते.

IPL 2023 : आज दुसरा डबल हेडर सामना; ‘या’ संघांमध्ये होणार लढत

हा गुन्हा अत्यंत धाडसी असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी याकडे विशेष लक्ष दिले. यानंतर गुन्हेशाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ (Vijay Dhamal) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, मुक्तार शेख यांच्या पथकाने संशयित आरोपींचा गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून पाठलाग करत ताब्यात घेतले. तसेच पथकाने संशयित आरोपींचा नाशिकसह कोल्हापुर, पुणे, कात्रज येथेही शोध घेतला. मात्र आरोपी नाशिकच्या सातपुर परिसरात आल्याची माहिती अंमलदार प्रवीण वाघमारे यांना मिळाली.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन डॉक्टरांसह एकाचा मृत्यू

दरम्यान, यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवत सातपुर परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी गुन्हा संगनमताने केल्याची कबुली दिली. यानंतर आरोपींकडून चोरी केलेली रोख रक्कमेपैकी ५३ लाख रुपये रोख तसेच चोरीच्या रक्कमेतून विकत घेतलेली वोल्स वॅगन कार किं. रु.४ लाख व ३० हजार रुपये किंमत असलेल्या एका फोनसह आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या