Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपोलिस शिपायास ३० हजारांची लाच स्वीकारताना अटक

पोलिस शिपायास ३० हजारांची लाच स्वीकारताना अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दाखल गुन्ह्यात अटक (Arrested) न करण्याकरिता ३० हजारांची लाच (Bribe) मागणाऱ्या पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (Anti-Corruption Department) सापळा रचून अटक करण्यात आली आहे…

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) हद्दीत जायखेडा पोलीस ठाणे (Jaikheda Police Station) येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात त्यांना अटक न करण्याकरिता पोलीस शिपाई सचिन राजेंद्र पवार (२९) (Sachin Rajendra Pawar) याने ३० हजारांची मागणी केली. यावरून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

दरम्यान, यावरून पोलीस अधीक्षक सुनील कडासने (Sunil Kadasane) अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Narayan Nyahalde) उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे (Sandeep Salunkhe) हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे, यांच्या पथकाने पवार यास सापळा रचून लाच घेतांना रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या