Monday, August 17, 2026
Homeक्राईमNashik Crime News: दहशत निर्माण करणाऱ्या रील बहाद्दर भाईंना पोलिसांचा दणका; उपद्रवी...

Nashik Crime News: दहशत निर्माण करणाऱ्या रील बहाद्दर भाईंना पोलिसांचा दणका; उपद्रवी २७ लाखांहून अधिक व्ह्यूजच्या आक्षेपार्ह रील्स हटवल्या

नाशिक | प्रतिनिधी
धारदार शस्त्रांचे प्रदर्शन करणे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रील बहाद्दरांवर नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

सायबर पेट्रोलिंगच्या माध्यमातून पोलिसांनी तब्बल २७.६ मिलियन (दोन कोटी ७६ लाख) व्ह्यूज आणि १.३ मिलियन (१३ लाख) लाइक्सचा टप्पा ओलांडलेल्या शेकडो आक्षेपार्ह रील्स सोशल मीडियावरून थेट हटवून नष्ट केल्या आहेत. सध्या अनेकांनी इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा अशा रील्सचा धडाका सुरू केल्याचे सायबर पेट्रोलिंगमधून समोर आले असून, पोलिसांनी आता अशा सर्व गुन्हेगारी प्रवृत्तींवर २४ तास वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी पेट्रोलिंग करत आहेत.

Sunil Tatkare: जयंत पाटलांनी फडणवीस-शिंदेंची भेट घेतली, अर्थखाते शरद पवार गटाकडे जाणार? सर्व चर्चांवर सुनील तटकरे म्हणाले…

धुरंधर फक्त चित्रपटात, नाशिकमध्ये कायदा!
स्वतःला गल्लीबोळातील भाई समजून रस्त्याच्या कडेला अड्डे जमवणे, टवाळखोरी करणे आणि रात्रीच्या अंधारात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांची नाशिक पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या थेट आदेशाने नाशिक शहरातील विविध भागांत विशेष कोम्बिंग ऑपरेशन्स राबवले जात आहेत. चित्रपटात एखादा धुरंधर नायक चालत असला, तरी प्रत्यक्षात नाशिक शहरात फक्त आणि फक्त कायदा चालणार, असा कडक आणि सडेतोड इशारा पोलिसांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

सायबर पेट्रोलिंग
-नाशिक पोलिसांच्या सायबर सेलकडून सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, विशेषतः इन्स्टाग्रामवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
-दाखल गुन्हेगारांचे आणि त्यांच्या गुन्ह्यांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ बनवणे, शस्त्रांचे प्रदर्शन करणारे रडारवर.
-सामाजिक सलोखा बिघडवणारे, महिलांचा अवमान करणारे अथवा आक्षेपार्ह ऑडिओ-व्हिडिओ बनविणाऱ्यांवर नजर.

कारवाई अशी…
२७.६ मिलियन रील व्ह्यूज सोशल मीडियावरून कायमचे हटवले.
१.३ हुल्लडबाजांचे एकूण लाइक्स एका फटक्यात गायब.
४३८ जण चालू महिन्यातील विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये चोपले.
११,६८५ जण मागील सहा महिन्यांत कायद्याचा भंग केल्याप्रकरणी नोटीसवर.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...