Saturday, May 18, 2024
Homeनगरपोलीस दलाच्या श्वान पथकातील ‘मिशका’ चे निधन

पोलीस दलाच्या श्वान पथकातील ‘मिशका’ चे निधन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील ‘श्वान मिशका’ याचा उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. लोणी व कोपरगाव पोलीस ठाण्यातील दाखल गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेण्यात श्वान मिशकाने मोठी कामगिरी केली होती. शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी पार पडला. यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्याला पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली.

- Advertisement -

श्वान मिशका हा नगर पोलीस दलातील श्वान पथकामध्ये 23 मे 2015 रोजी दाखल झाला. त्यानंतर 19 ऑक्टोबर 2015 ते 31 जुलै 2016 या कालावधीत त्याने प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर येथे गुन्हे शोधक प्रशिक्षण पूर्ण केले. 1 ऑगस्ट 2016 रोजी नगर पोलीस दलातील श्वान पथकात हजर होऊन व त्याने गुन्हे शोध कामकाजास सुरूवात केली.

2017 मध्ये लोणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर श्वान मिशका यास पाचारण करण्यात आले होते. त्याला घटनास्थळी पडलेल्या कुर्‍हाडीच्या दांड्याचा वास दिला असता त्याने माग काढत लोणी पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला व लोणी पोलीस ठाण्यामध्ये बसलेल्या एका इसमासमोर जाऊन भुंकू लागला व गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची कामगिरी केली.

2018 मध्ये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये कोळपेवाडी येथे गुन्हा दाखल झाल्यावर श्वान मिशका याला पाचरण करण्यात आले. त्याने माग काढत कोळगाव थडी रोडने मार्ग काढत सोन्याचे 9 बॉक्स शोधले. तसेच पुढे 600 ते 700 मीटर जाऊन 30 बॉक्स सोन्याने भरलेले दागीने त्याने शोधून दिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या