Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashiK Crime News : 'त्या' खून प्रकरणातील सराईत आठवडा...

NashiK Crime News : ‘त्या’ खून प्रकरणातील सराईत आठवडा उलटूनही सापडेना

संशयित ठिकाणे बदलत असल्याने व्यत्यय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिंडाेरी राेडवरील (Dindori Road) गुलमाेहाेर नगरात (दि. १०) घडलेल्या ८० वर्षीय कुसुम सुरेश एकबाेटे यांची निर्घृण हत्या (Murder) करुन पसार झालेल्या संशयिताचा आठवडा उलटूनही तपास लागलेला नाही. हा गुन्हा उघड झाला असला तरी, म्हसरुळ पाेलिसांसह गुन्हेशाखेस यातील सराईत मारेकरी अटक (Arrested) करण्यात अपयश आले असून हा संशयित पेठ, हरसूल व इतर आदिवासी बहुल भागात वारंवार वास्तव्याची ठिकाणे बदलत असल्याने त्याच्या हाती बेड्या पडण्यास विलंब हाेत आहे, असे पाेलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये ‘दे दणादण’; Video व्हायरल

कुसुम सुरेश एकबाेटे (रा. राधानंद निवास, स्वामी समर्थ केंद्राजवळ) या १० जुलै राेजी सकाळी दहा वाजता घरात असतांना त्यांच्या मानेवर धारदार विळ्याने अनेक वार करुन साेसायटीत राहणाऱ्या २२ वर्षीय बेराेजगार व सराईत तरुणाने (Youth) हत्या केल्याचे त्याच दिवशी तपासात समाेर आले हाेते. पाेलिसांनी (Police) परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, घरातील काही पुरावे व आजूबाजूच्या नागरिकांकडे तपास करुन महत्त्वाचे पुरावे संकलित केले हाेते. श्वानपथकानेही संशयिताचा काहीसा माग काढला. पण, त्यात अपयश आले. तर, तपासात ज्या विळ्याच्या सहाय्याने एकबाेटे यांच्या गळ्यावर वार करण्यात आले ताे विळा एकबाेटे यांच्यासह साेसायटीत राहणाऱ्या तिऱ्हाईत कुटुंबाच्या घरातील असल्याचे समाेर आले हाेते.

हे देखील वाचा : IAS वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला अटक

त्यानुसार पाेलिसांनी या कुटुंबाकडे तपास केंद्रीत केला, तेव्हा या कुटंबातील २२ वर्षीय तरुण घटनेनंतर पसार असल्याचे उघड झाले. त्यानुसार, त्याचा शाेध सुरु झाला असता पाेलिसांनी तांत्रिक विश्लेषणानुसार त्याचा माग काढला. त्यावरुन एक -दाेन पथके हरसूल येथे पाेहाेचली. तेथेही संशयित (Suspect) मिळाला नाही. त्यानंतर या पथकासह अन्य पथके रिकाम्या हाती परत आली. पण, हा संशयित हरसूल, पेठ, सुरगाणा भागातील वस्ती, पाड्यांवर असल्याची ‘अपडेट’ माहिती तपास पथकांना मिळाली. त्यानुसार एक पथक संबंधित गावात पाेहाेचले. पण, येथूनही सराईताने गुंगारा दिला. त्यानंतर त्याचे लाेकेशन दुसऱ्या ठिकाणी ट्रेस झाले. त्यामुळे पथक तेथे गेले. तरीही पाेलिसांना हाती भाेपळाच मिळाला. त्यामुळे सराईत गुंगारा देत असल्याचे लक्षात येताच, वरिष्ठांच्या सूचनेने एक पथक संबंधित ठिकाणी मुक्कामी आहे. तरीही त्याचा माग काढण्यात अपयश आले आहे.

हे देखील वाचा : शरद पवार नाशकातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

सराईत असल्यानेच गुंगारा

एकबाेटे यांची हत्या करुन पळून गेलेला संशयित सराईत असून व्यसनी आहे. तसेच जेलवारी केल्याने त्याला गुन्ह्यानंतरच्या पळवाटा माहित आहे. त्यामुळेच ताे गेल्या सात दिवसांपासून पाेलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे हा सराईत हातीच लागत नसल्याने म्हसरुळ पाेलिसांसह गुन्हेशाखेची तात्पुरती नाचक्की झाली आहे. विशेष म्हणजे, सराईताचा पूर्वइतिहास, माहिती पाेलिसांना माहिती असतानाही ताे सापडत नसल्याने परिसरातीस सामान्यांकडून आश्चर्य व्यक्त हाेत आहे. तर आजही तपास पथक संशयिताच्या मागावर संबंधित ठिकाणी मुक्कामीच आहे. 

हे देखील वाचा : बेकायदेशीर उत्खननप्रकरणी अधिकार्‍यांची बघ्याची भूमिका; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

नातलग संतप्त

मागील सहा महिन्यांत शहरात घडलेल्या खुनांच्या घटनांतील विविध संशयित, विधिसंघर्षित संबंधित पाेलीस ठाणे व इतर पथकांनी दाेन ते अडीच दिवसांत धुंडाळून आणले आहेत. मात्र एकबाेटे हत्या प्रकरण याला अपवाद ठरले आहे. सात दिवस उलटूनही मारेकरीच हाती लागत नसल्याने मृताच्या नातलगांनी पाेलिसांच्या कार्यशैलीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, हत्येमागील मुख्य कारण समाेर आले नसून संशयित अटक झाल्यावरच त्याचा उलगडा हाेणार आहे. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या