Thursday, May 15, 2025
Homeनगरपोलिसांना मिळणार 320 फ्लॅट 115 कोटींच्या निधीस मंजूरी

पोलिसांना मिळणार 320 फ्लॅट 115 कोटींच्या निधीस मंजूरी

आ. संग्राम जगताप यांनी सरकारचे वेधले होते लक्ष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

लालटाकी येथील पोलिस वसाहतीमध्ये पोलिसांना 320 फ्लॅट मिळणार असून यासाठी 115 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली आहे. पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांच्या शासकीय वसाहतीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे याठिकाणी नवीन इमारत व निवासस्थानाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. आ. जगताप यांनी 2023 साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच विधानभवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. आता आ.जगताप यांच्या या पाठपुराव्यास यश आले.

राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने नुकतीच अहिल्यानगर मधील सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर नवे 320 फ्लॅट बांधण्यासाठी 115 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाच्या मंजुरीची वर्क ऑर्डर महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने काढली आहे. जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना लवकरच नवे घरे मिळतील, अशी माहिती आविष्कार ग्रुपचे मनोजकुमार जाधव यांनी दिली.

2 बेडरूम, हॉल व किचन
अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा येथे असलेल्या पोलिस मुख्यालय येथील जागेवर सध्या असलेली घरे पाडून तेथे नवे बहुमजली अपार्टमेंट उभारून 500 स्क्वेअर फुटाचे, 320 टूबीएचके फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. तसेच पाण्याची टाकी, अंतर्गत पथदिवे व अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसही उभारण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...