Sunday, November 8, 2026
Homeक्राईमNashik Police News: पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीचे वेध; २५ अधिकाऱ्यांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नतीची...

Nashik Police News: पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीचे वेध; २५ अधिकाऱ्यांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नतीची संधी

नाशिक | प्रतिनिधी
राज्य पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक तथा सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र) पदावर पदोन्नती मिळवण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सन २०२६-२०२७ च्या पदोन्नती निवडसूचीसाठी पोलीस निरीक्षकांची नावे शर्यतीत आली असून, यामध्ये नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणमधील तब्बल २५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शासकीय नियमांनुसार सेवाप्रवेशाची तारीख, एकूण सेवा आणि सेवाज्येष्ठतेच्या नियमांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ज्येष्ठतासूचीमधील क्रमांकांनुसार या अधिकाऱ्यांची नावे पदोन्नतीच्या विचारकक्षेत घेण्यात आली आहेत. पदोन्नतीची शर्यत निर्धोक पार पडावी आणि प्रशासकीय अडचणी किंवा न्यायाधिकरणातील याचिकांचे अडथळे येऊ नयेत, यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या सर्व अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तकांची, गोपनीय अहवालांची व विभागीय चौकशीची पडताळणी केली जात आहे.

- Advertisement -

नाशिक परिक्षेत्रातील गोपनीय अधिकाऱ्यांच्या अहवालांची प्रतवारी, विभागीय, संक्षिप्त चौकशीचा तपशील, तसेच संगणक व भाषा परीक्षा, सुटीबाबतचे आदेश या सर्व कागदपत्रांची छाननी २७ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता डीजी कार्यालयात होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

मालेगाव डोंगराळे चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरण: आरोपी विजय उर्फ शेखर खैरनारला फाशीची शिक्षा

विशेष म्हणजे २० फेब्रुवारी २०२४ मध्ये अंबड पोलीस ठाण्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेले अशोक नजन व शालार्थ आयडी घोटाळ्यात सहसंशयित असलेले नाशिकरोड पोलीस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांचेही नाव निवडसूचीतून समोर आले आहे.

पदोन्नती शर्यतीत १३ अधिकारी
सुरेश शिवनाथ आव्हाड, रामदास राजाराम शेळके, अशोक उत्तम गिरी, हेमंत सुभाष पाटील, युवराज दिनकर पत्की, अंचल ईश्वरप्रसाद मुदगल, प्रविण श्रीराम चव्हाण, अशोक निवृत्ती नजन, विजय निंबा तलवारे, जग्वेंद्रसिंग नवलसिंग राजपूत, ललिता नानाजी तोडसे, आम्रपाली त्र्यंबक तायडे, ज्योती तुकाराम आमणे.

नाशिक ग्रामीणचे १२ अधिकारी
दत्ता गोंविद चौधरी, विजय फकिरराव शिंदे, समाधान चंद्रभान नागरे, संजयकुमार रामनाथ ब्राह्मणे, प्रदीप बाळासाहेब देशमुख, यशवंत महिपत सोळणसे, अनिल विठ्ठल भवारी, भगवान हरीभाऊ मथुरे, अनिल पोपटराव हिरे, प्रशांत ईश्वरलाल अहिरे, विजय मारूती कारे, भारत दतात्रय जाधव.

ताज्या बातम्या

Pathardi : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसोबत ना. विखेंची दिवाळी

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी कुटुंबांच्या घरातील दिवाळीचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. शेतातील उभ्या पिकांची चिंता, पाण्याची टंचाई, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न आणि...