Sunday, November 8, 2026
Homeक्राईममालेगाव डोंगराळे चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरण: आरोपी विजय उर्फ शेखर खैरनारला...

मालेगाव डोंगराळे चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरण: आरोपी विजय उर्फ शेखर खैरनारला फाशीची शिक्षा

मालेगाव | प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे (Dongarale) येथील चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या (Minor sexual assult and murder Case) प्रकरणात आज, १६ ऑक्टोबर रोजी मालेगाव येथील जलदगती न्यायालयाने (Malegaon Fast Track Court) आरोपी विजय ऊर्फ शेखर खैरनार याला या प्रकरणी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील दोषी विजय खैरनार याला न्यायालयाने फाशीची शिक्षा (Death Sentenced) सुनावली असून, पीडित मुलीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.

साडेचार वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या; नेमके प्रकरण काय?
विजय खैरनार असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी खैरनारने डोंगराळे येथील रहिवासी असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे पीडित चिमुकली आरोपीला ‘दादा’ म्हणायची. मात्र त्याने ‘दादा’ च्या नात्याला काळीमा फासला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी तपासानंतर विजय ऊर्फ शेखर खैरनार याला अटक केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात आला. यानंतर आता अवघ्या दहा महिन्यात कोर्टाने खैरनारला फाशीची शिक्षा सुनावली आहे. राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

रागाच्या भरात शब्द तोंडातून निघून गेला असेल तर माफी मागतो; संजय राऊतांनी सर्वोच्च न्यायालयाची मागितली माफी

या प्रकरणी पोलिसांनी अलीकडेच २२५ पानांचं आरोपपत्र कोर्टात दाखल केलं होतं. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने एकूण २४ साक्षीदार तपासले. यात एका प्रत्यक्षदर्शी महिलेची आणि सात वर्षाच्या अन्य एका मुलीची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

३० सप्टेंबरला आरोपी दोषी; चार गंभीर आरोप सिद्ध
या खटल्यात ३० सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीविरुद्धचे गंभीर आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. लैंगिक अत्याचार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्यासंबंधीच्या आरोपांचा यात समावेश होता. खटल्यादरम्यान एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाने वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक तपासणी आणि DNA पुरावे न्यायालयासमोर मांडले. साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील कागदपत्रे या खटल्यात महत्त्वाची ठरली.

खटल्याच्या अंतिम टप्प्यात आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्याच्या वर्तनासंदर्भातील अहवालही न्यायालयात सादर करण्यात आले होते. यामध्ये कारागृहातील अधिकाऱ्यांसह मानसोपचार तज्ज्ञ आणि पोलिसांनी दिलेल्या अहवालांचा समावेश होता.

पिडीत कुटुंबाला १० लाखांची मदत
या प्रकरणातील निकालाकडे पीडितेच्या कुटुंबीयांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. न्यायालयाने विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली असून, पीडितेच्या कुटुंबाला १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सुनावणीदरम्यान मांडण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि आरोपीची बाजू या सर्व बाबींचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. डोंगराळे येथील या घटनेनंतर राज्यभरातून व्यक्त झालेला संताप आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी यामुळे हा खटला चर्चेत राहिला होता.

ताज्या बातम्या

Pathardi : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसोबत ना. विखेंची दिवाळी

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी कुटुंबांच्या घरातील दिवाळीचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. शेतातील उभ्या पिकांची चिंता, पाण्याची टंचाई, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न आणि...