Saturday, April 26, 2025
Homeक्राईमपोलीस अधिकार्‍याचे घर फोडून सुमारे 13 तोळे लांबविले

पोलीस अधिकार्‍याचे घर फोडून सुमारे 13 तोळे लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव उपनगरात सोनेवाडी रस्त्यावर एका पोलीस अधिकार्‍याच्या घरात चोरट्याने भरदिवसा चोरी करत सुमारे 13 तोळे दागिन्यांचा ऐवज लंपास केला. काल मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

नगर येथे स्थानिक गुन्हे शाखेत काम केलेले व सध्या नाशिक येथे नियुक्तीस असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्या घरात ही चोरी झाली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या मातोश्रीही बाहेर गेलेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या घरी आल्यावर घराच्या दरवाजाची कडी तुटल्याचे दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता चोरट्याने कपाटातील दागिने चोरून नेल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, कोतवाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एकाच दुचाकीवर आलेले तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यातील दोघे घराबाहेर उभे होते व एकाने घरात जाऊन चोरी केली. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी बारा वाजण्याच्या सुमारास घराची पाहणी केली. त्यानंतर डाव साधला. भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : मनपा सेवक, एजंटाच्या घरावर ईडीचे छापे; बनावट जन्मदाखल्याप्रकरणी...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदात्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात (Case) आज ईडीच्या (ED) पथकाने शहरात महानगरपालिकेत (NMC) जन्ममृत्यू विभागात...