Friday, May 3, 2024
Homeनगरसलग दुसर्‍या वर्षी पोलीस परेड सोहळा रद्द

सलग दुसर्‍या वर्षी पोलीस परेड सोहळा रद्द

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या (Covid 19) दुसर्‍या लाटेमुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध (Restrictions) आज स्वातंत्र्यदिनापासून (Independence Day) शिथिल होत आहे. ऐकीकडे निर्बंध शिथिल केले असले तरी सलग दुसर्‍या वर्षी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने होणारा पोलीस परेड (Police parede) व पारितोषिक वितरण सोहळा रद्द करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानात फक्त झेंडावंदन कार्यक्रम होणार (There will be only a flag waving ceremony at the police headquarters grounds) असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक (गृह) बाजीराव पोवार (Deputy Superintendent of Police (Home) Bajirao Powar) यांनी दिली.

- Advertisement -

करोना संसर्गाचा उद्रेक मार्च 2020 पासून सुरू झाला. जिल्ह्यात करोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा मोठा फटका बसला. आजही रूग्ण संख्या वाढतीच आहे. दुसर्‍या लाटेचे निर्बंध राज्य सरकारने काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने देखील जिल्ह्यातील काही निर्बंध हटवलेत. ही सर्व पार्श्वभूमी असली, तरी स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दरवर्षी जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालयात शासकीय झेंडावंदन होते. यावर्षीही त्याची तयारी करण्यात आली आहे. परंतु करोनामुळे पोलीस मुख्यालयातील मैदानावर पोलीस दलाकडून होणारे परेड व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आला. ऑगस्ट 2020 व आता ऑगस्ट 2021 अशा सलग दुसर्‍या वर्षी हा सोहळा रद्द झाला आहे.

जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यालयाच्या मैदानावर होणार्‍या पोलीस परेड कार्यक्रम पाहण्यासाठी नगर शहरासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. याठिकाणी पोलीस परेड (Police parede), कवायती (Exercises), पारितोषिक वितरण सोहळे होत असतात. लष्कराचे स्वतंत्र बँड पथक, शासकीय विभागांची वेगवेगळी पथके, कॉलेजमधील एनसीसी तुकडी, गृहरक्षक, अग्नीशमक दल, सामाजिक वनीकरण विभागाची तुकड्यांचा या परेड सोहळ्यात सहभाग असतो. परंतु, करोनामुळे सर्व कार्यक्रम यावर्षीही रद्द करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या