Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्याद्वारका परिसरात बॉम्ब असल्याचा पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं असं काही...

द्वारका परिसरात बॉम्ब असल्याचा पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं असं काही…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

सतत गर्दी असलेल्या द्वारका परिसरात बॉम्ब असल्याचा फोन ११२ क्रमांकावर आला आणि पोलिसांची (Police) तारांबळ उडाली….

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार (दि.२७) एका व्यक्तीने पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर फोन करून द्वारका येथे बॉम्ब असल्याची माहिती दिली. यावरून तात्काळ बॉम्ब स्कॉड, डॉग स्कॉड, मुंबईनाका, भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ द्वारका येथे पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.

त्यानंतर फोन करणारा व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची विचारणा सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या