चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
तक्रारदार यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल न करण्याच्या बदल्यात तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनचे (Mehunbare police station) पोलीस उपनिरिक्षक योगेश ढिकले हे लाच घेतांना एसीबीच्या (acb) जाळ्यात अडकल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुढील कारवाई एसीबीच्या आधिकारी करीत असून यामुळे मात्र परिसरात एकच खळबळ उडली आहे.
- Advertisement -
प्राप्त माहितीनूसार तक्रारदार यांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल न करण्यासाठी ढिकले यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदार खात्री करुन आज एसीबीच्या पथकाने मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये सापळा रचून ढिकले यांना रंगेहात पकडल्याची चर्चा आहे.