Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : राजकारणाचे 'किंग', तब्बल चार वेळा मुख्यमंत्री; 'अशी' आहे शरद...

Sharad Pawar : राजकारणाचे ‘किंग’, तब्बल चार वेळा मुख्यमंत्री; ‘अशी’ आहे शरद पवारांची राजकीय कारकीर्द

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे…

- Advertisement -

गेली 55 वर्षे शरद पवार हे राजकारणात सक्रिय होते. वयाच्या 83 व्या वर्षीही तरुणांनाही लाजवेल असा उत्साह घेऊन शरद पवार हे राजकारणात सक्रिय होते. बारामती तालुक्यातील काटेवाडीपासून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात करून तो दिल्लीपर्यंत पोहचला. जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास…

शरद पवार यांचा जन्म दि. 12 डिसेंबर 1940 साली बारामतीमधील काटेवाडीमध्ये झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. आपल्या वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

1967 साली शरद पवार हे पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1977 मधील आणीबाणीनंतर काँग्रेसचे दोन गट पडले. यशवंतराव चव्हाण यांच्यासह वसंतदादा पाटील, शरद पवार हे ‘रेड्डी कॉंग्रेस’मध्ये गेले.

1978 मध्ये निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र आले. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. मात्र या सरकारमध्ये अनेक नेते अस्वस्थ होते. यामध्ये शरद पवार यांचाही समावेश होता.

Sharad Pawar Resigns : हे कुठेतरी खटकते, त्यांनी…; अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

त्यानंतर शरद पवार हे 40 समर्थकांसह बाहेर पडले आणि आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर जुलै 1978 मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दलाचे’ नेते म्हणून शरद पवार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 38 व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याचा मान शरद पवार यांना मिळाला.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्या हाती काँग्रेसची सत्ता आली. राजीव गांधी यांनी शरद पवार यांना काँग्रेसमध्ये येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच काळात 1984 मध्ये शरद पवार हे बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. मात्र लगेचच ते दिल्लीतून परतले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1986 मध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला आणि 1988 मध्ये दुसऱ्यांदा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री बनले.

शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले ते 1990 च्या निवडणुकीनंतर. ही निवडणूक काँग्रेसने शरद पवार यांच्या नेतृत्त्वातच लढवली होती. मात्र, या निवडणुकीला अनेक पदर होते. महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष युती करून एकत्रित आले होते. त्यामुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान होते.

शिवाय, निवडणुकीच्या चार वर्षांपूर्वीच पवार काँग्रेसमध्ये परतले होते आणि शेवटची दोन वर्षेच मुख्यमंत्रिपद मिळाले होते, त्यामुळे आव्हानात्मक स्थिती होती. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने 94 जागांपर्यंत झेप घेतली, तर काँग्रेसला 147 जागा जिंकता आल्या. त्यामुळे बहुमताचा आकडा काँग्रेसकडे होता. मात्र, पवार जवळपास काठावर पास झाले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Sharad Pawar : निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाले शरद पवार? वाचा ‘ते’ भाषण जसंच्या तसं…

या निवडणुकीला पत्रकार मकरंद गाडगीळ हे ‘वॉटरशेड इलेक्शन’ असं म्हणतात. कारण महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपचा वाढता प्रभाव या निवडणुकीपासूनच पुढे सुरू झाला. एकहाती विजय मिळण्याची सवय लागलेल्या काँग्रेसला जोरदार विरोध या निवडणुकीत पाहायला मिळाला होता. पण अखेर शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान झालेच.

त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा दिल्लीत जायचे ठरवले. राजीव गांधी यांच्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद प्रकरणानंतर मुंबईत मोठी हानी झाली. त्यामुळे शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात आले आणि चौथ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते.

सोनिया गांधी यांनी सक्रीय राजकारणात यायचे ठरवले आणि काँग्रेसमधील एका फळीला त्यांनी पंतप्रधान व्हावे असे वाटतं होते. मात्र 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून दुसऱ्यांदा बंड करत पी ए संगमा, तारिक अन्वर यांच्या सोबतीने ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ पक्षाची स्थापना केली.

1999 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले. मात्र निकालानंतर ते पुन्हा एकत्र आले. मात्र राज्यात आघाडीचे अन् केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार आले. 2004 साली वाजपेयी सरकार पायउतार झाले. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि शरद पवार यांनी 10 वर्षे केंद्रीय कृषीमंत्रीपद स्वीकारले.

Sharad Pawar Resigns : साहेबच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष! नाशिकचे कार्यकर्ते झाले भावूक

2019 मध्ये महाराष्ट्रात सत्तेचा मोठा पेच निर्माण झाला होता. शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर सत्तेची समीकरणं बदलली. शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आणि काही काळात हे सरकार कोसळले.

- Advertisment -

ताज्या बातम्या