Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत मोठी राजकीय घडामोड; ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल?

मुंबईत मोठी राजकीय घडामोड; ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल?

मुंबई | Mumbai
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना युतीने स्पष्टच बहुमत मिळवले आहे. महापौर कुणाचा होणार यावरुन नवे राजकीय नाट्य रगंले आहे. एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती आहे. यामुळे शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. अशातच आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे ज्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत घडमोड घडली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॅाट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे.देवाची इच्छा असेल तर मुंबईत आपला महापौर बसू शकतो, असे सूचक वक्तव्य करून सत्तेसाठीची समीकरणे जुळवत असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. असे असताना उद्धव ठाकरे यांचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असल्यामुळे विरोधी बाकांवर बसण्याची मानसिकता नसलेले ठाकरे गटाचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लॅंड्स हॅाटेल मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी शिवसेनेचे “ॲापरेशन टायगर” सक्रीय झाल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच ठाकरे गटाचे काही नगरसेवक नॅाट रिचेबल असून ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहीती सूत्रांनी दिली.

YouTube video player

माघ स्नानादरम्यान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांना पोलिसांनी रोखलं, समर्थकांसोबत झटापट

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले तरी शिवसेनेच्या समर्थनाशिवाय त्यांची सत्ता येणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेची वाटाघाटीची शक्ती (बार्गेनिंग पॉवर) बरीचशी वाढली आहे.

दरम्यान, मुंबईत अडीच अडीच वर्ष महापौरपद द्यावे अशी इच्छा शिवसेना नगरसेवक आणि शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा महापौर बसावा अशी शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये या मुद्दयावरुन चर्चा सुरु असल्याचे कळतेय.. आता भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या