मुंबई | Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत आज (सोमवारी) मुंबईत भाजपच्या नूतन कार्यालयाच्या (BJP New Office) भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देतांना विविध मुद्द्यांवर भाष्य करत ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी ते म्हणाले, “मी छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मृतींना अभिवादन करतो. सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी आज शुभ दिवस आहे. महाराष्ट्र भाजप (BJP Maharashtra) आपल्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवीन सुरूवात करत आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून छोटे मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांना माहिती आहे ती कार्यालय हे आपले मंदिर आहे. पक्षाचे सिद्धांत संरक्षित व संवर्धन हे कार्यालयात होतात. या कार्यालयात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते, बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल, मात्र भाजपसाठी कार्यालय म्हणजे मंदिर आहे, “असे शाह यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “आम्ही नेहमीच सिद्धांताच्या आधारे निती घडवली असून,भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केला आहे. मी सर्व माजी अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आता भाजप कुठल्या कुबड्यांचा आधार न घेता चालत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हा एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसत आहे. ज्या नेत्यांनी कठीण परिस्थितीत पक्ष मजबूत केला, पक्षाच्या विचारांचे बीज लावून त्याचे वटवृक्ष केले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना मी प्रणाम करतो. मला देखील अध्यक्ष होता आले. भारतात एकमेव भाजप हा पक्ष आहे, जिथे बुथप्रमुख हा पक्षाचा, देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाहीनुसार चालत नाही. ज्याच्यात क्षमता आहे तोच या ठिकाणी मोठा नेता होता. आम्ही हे सिद्ध केले की, घराणेशाही या देशात चालणार नाही. तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावाच लागेल, असे देखील अमित शाह यांनी म्हटले.
निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ करा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Elections) भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत. २०१४ च्या निवडणुकीत आम्ही युतीचा प्रयत्न केला मात्र युती झाली नाही. त्यामुळे निवडणूक स्वतंत्र लढलो आणि महाराष्ट्राला पहिला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. त्यानंतर तीनवेळा आम्हाला बहुमत मिळाले. डबल इंजिन सरकार नको आहे. ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे” असेही शाह म्हणाले.
कसं आहे भाजपचे राज्यातील नवीन कार्यालय?
महाराष्ट्रातील नवीन भाजप कार्यालय हे ५५ हजार चौरस फुटाचे आहे. यात एक लायब्ररी, सहा मिटिंग रूम, एक कॉन्फरन्स रूम, ४०० शीट असलेले एक भव्य सभागृह, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसोबत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय देखील आहे. याशिवाय कार्यालयात काही कार्यकर्त्यांना राहता येईल याची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याचे शाहा म्हणाले.




