Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : "ब्राझिलियन मॉडेलने २२ वेळा केलं मतदान"; राहुल गांधींनी फोडला...

Rahul Gandhi : “ब्राझिलियन मॉडेलने २२ वेळा केलं मतदान”; राहुल गांधींनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणा निवडणुकीबद्दल मोठा गौप्यस्फोट

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे मतचोरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडला आहे. त्यांनी “एच फाइल्स” हे शीर्षक असलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक हेराफेरीचे गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी, काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एका पोस्टमध्ये राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे वर्णन “हायड्रोजन बॉम्ब लोडिंग” असे केले होते.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले,”बरीच पडताळणी केल्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि हरियाणामध्ये मतचोरी झाल्याचे आढळून आले. ज्यावेळी मी आकडे बघितले तेव्हा माझा विश्वास बसला नाही. तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. मी माझ्या टीमला बोललो की, सर्व आकडे प्रत्येक सोर्सकडून डबल क्रॉस चेक करा. यानंतर माझ्या टीमने क्रॉस चेक केले असता हरियाणात पोस्टल मतदानात (Voting) काँग्रेस पुढे होती. एक्झिट पोलमध्ये हरियाणात आमचाच विजय दाखवला होता. हरियाणात काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये १.१८ लाख मतांचा फरक होता. पोस्टल बॅलेटमुळे काँग्रेसला (Congress) ७६ आणि भाजपला १७ जागा मिळाल्या. नेहमीच असे घडले आहे की पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांची दिशा समान होती. मात्र हरियाणात काँग्रेसचा २२ हजार ७७९ मतांनी पराभव झाला”, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

YouTube video player

पुढे ते म्हणाले, हरियाणात (Haryana) एका ब्राझिलियन महिलेने २२ ठिकाणी कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने मतदान केले. हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणात २५ लाख मते चोरीला गेली. यात ५ लाख २१ हजारांहून अधिक दुबार मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण २ कोटी मतदार आहेत. यातील २५ लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बोगस होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असे राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच दालचंद उत्तर प्रदेशात मतदार आहे तोच हरियाणात सुद्धा मतदार आहे, त्यांचा मुलगा हरियाणामध्ये मतदार आहे तो उत्तर प्रदेशात सुद्धा मतदान करतो, असे हजारोंच्या संख्येने लोक असून, ते भाजपशी संबंधित आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

हरियाणात जे घडलं तेच बिहारमध्येही घडणार

राहुल गांधी म्हणाले, “हरियाणामध्ये जे घडलं तेच बिहारमध्येही (Bihar) घडणार. बिहारमधील मतदार यादीत घोटाळे झाले असून, आम्हाला शेवटच्या क्षणी मतदार यादी देण्यात आली, असे त्यांनी सांगितले. यावेळी राहुल गांधींनी बिहारमधील अनेक मतदारांना मंचावर आमंत्रित केले आणि दावा केला की, त्यांच्या संपूर्ण कुटुंबांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. असेही त्यांनी म्हटले.

एकाच महिलेचे एकाच बूथवर २२३ वेळा नाव

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोगाने त्या महिलेने किती वेळा मतदान केले याचे उत्तर द्यावे. यासाठी निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत.एक महिला दोन मतदान केंद्रांवर २२३ वेळा दिसते. निवडणूक आयोगाने हे स्पष्ट करावे की ही महिला इतक्या वेळा का दिसली. म्हणूनच निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज काढून टाकतो. हरियाणात अशी हजारो उदाहरणे आहेत. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर कोणालाही कळणार नाही. तसेच एका मुलीने १० ठिकाणी मतदान केले. याशिवाय बनावट फोटो असलेले १,२४,१७७ मतदार होते. असेही त्यांनी म्हटले.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा दाखवला व्हिडीओ

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचे व्हिडिओ फुटेज दाखवले. त्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी एक बाइट दिली, ज्यामध्ये त्यांनी सिस्टमचा उल्लेख केला. त्यांनी हसत विचारले, ही सिस्टम काय आहे?” परिणामी काँग्रेस हरियाणात निवडणूक हरली. त्यामुळे सैनी कोणत्या व्यवस्थेबद्दल बोलत होते? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

गणेश

Ganesh Naik: सहर शेखच्या वक्तव्याची मंत्री गणेश नाईकांकडून पाठ राखण; महायुतीतील...

0
पालघर | Palgharगेल्या काही दिवसांपासून मुंब्रा भागातील AIMIMच्या नगरसेविका सहर शेख यांच्या विधानावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पूर्ण मुंब्रा हिरवा करू, असे विधान त्यांनी...