नवी दिल्ली | New Delhi
बिहारमध्ये (Bihar) दुसऱ्या टप्प्याचे मतदान संपले आणि सत्तेच्या चाव्या कुणाकडे याचा फैसला मतपेटीत बंद झाला. १४ नोव्हेंबर रोजी याचा निकाल (Results) लागणार असून सगळ्याच पक्षांची, त्यांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अशात आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
त्यामध्ये सर्वच एक्झिट पोलनी भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची तर तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनचा सुपडा साफ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतरांना दोन ते सहा जागा मिळतील. त्यामध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला दोन ते सहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिहारच्या निवडणुकीसाठी (Bihar Election) पहिल्या टप्प्यात ६४ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ६७.६६ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याचा फटका कुणाला बसणार हे आता १४ नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात ६८.५२ टक्के मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात २० जिल्ह्यांमधील १२२ जागांसाठी ६८.५२ टक्के मतदान झाले. २०२० निवडणुकीपेक्षा १० टक्के अधिक मतदान झाले असून बगहामध्ये १५ हजार लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
एक्झिट पोलची आकडेवारी
मॅट्रीज आयएएनएस
एनडीए – १४७-१६७
महागठबंधन – ७०-९०
इतर – २-६
चाणक्य
एनडीए – १३०-१३८
महागठबंधन – १००-१०८
इतर – ३-५
पोल डायरी
एनडीए – १८४-२०९
महागठबंधन – ३२-४९
इतर – १-५
प्रजा पोल
एनडीए – १८६
महागठबंधन – ५०
इतर – ७
पोल Strat
एनडीए – १३३-१४८
महागठबंधन – ८७-१०२
इतर – ३-५
टीआयएफ रिसर्च
एनडीए – १४५-१६३
महागठबंधन – ७६-९५
इतर – ०-१
जेव्हीसी
एनडीए – १३५-१५०
महागठबंधन – ८८-१०३
इतर – ३-६




