मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून सदनिका घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल न्यायालयाने (Court) दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास तसेच औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्वीकारला. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच कोकाटे यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त फडणवीस यांनी सरकारवरील नामुष्की टाळली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी शहर गुन्हेशाखेची (City Crime Branch) दोन पथके गुरुवारी (दि.१९) सायंकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. याप्रकरणी कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, आज (शुक्रवारी) त्यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी कोकाटे यांना पोलीस अटक करतात, की त्यांना जामीन मिळतो असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. दुसरीकडे अॅड. अंजली राठोड-दिघोळे यांनी कोकाटेंविरोधात उच्च न्यायालयातही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
जिल्हा न्यायालयाने (District Court) कोकाटेंना दोषी ठरवले त्याच दिवशी कोकाटे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कारणास्तव दाखल झाले आहेत. हाच मुद्दा त्यांच्यावतीने वकिलांनी कोर्टातही मांडला. मात्र, कोर्टाने हा युक्तीवाद फेटाळून लावत कोकाटेंच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यांनतर न्यायालयाचे अटक वॉरंट शहर पोलिसांना बुधवारी (दि.१७) सांयकाळी प्राप्त झाले. त्यानुसार कोकाटे यांना अटक करण्यासाठी गुरुवारी (दि. १८) सायंकाळच्या सुमारास निघालेले शहर पोलिसांचे एक पथक मुंबईला रात्री पोहोचले.
यावेळी शहर पोलीस आयुक्तालयाचे प्रभारी पोलीस उपायुक्त तथा गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके (Sandeep Mitke) यांनी सांगितले की, तीन अधिकारी व दहा अंमलदारांचा या पथकात समावेश आहे. कोटनि दिलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी हे पथक लिलावती लणालयात पोहोचले. तेथे डॉक्टरांशी चर्चा करून पुढील कार्यबाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले. या शिक्षेविरोधात मुंबई हायकोर्टात कोकाटे यांनी दाद मागितली आहे. त्यांच्या अर्जावर आज (दि.१८) रोजी दुपारी तीन वाजता सुनावणी होणार असून, त्यापूर्वीच पोलिस माजी मंत्र्यांना अटक करतात की, तिथे कोकाटेंना अंतरिम जामिन मंजूर होतो, याची उत्सुकता सबीना आहे.
अंजली राठोड-दिघोळे काय म्हणाल्या?
नाशिक कोर्टाने माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, कोर्टाने त्यांच्या ताब्यातील त्या सदनिका परत घेण्याबाबतचा आदेश दिलेले नाही, मूळ मुद्दाः सदनिकांचाच आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात एक हस्तक्षेप याचिका मुंबई हायकोर्टात सादर केली आहे. कोकाटे यांच्या अपीलावेळी आम्ही आमची बाजू मांडू लढाई सुरूच राहिल, असे अॅड. अंजली राठोड दिघोळे यांनी सांगितले.
विजय कोकाटे फरारच
सदनिका घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाने माजी मंत्री कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचे वॉरंट बजावल्यानंतर घडामोडी त्यांच्याभोवती केंद्रित झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या समवेत असलेले दुसरे आरोपी त्यांचे बंधू विजय कोकाटे हे मात्र पसार आहेत. माणिकराव कोकाटे हे लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे उपचार घेत आहे. मात्र, विजय कोकाटे यांच्याबद्दल पोलीस प्रशासनाला कुठलीही माहिती नाही.
कोकाटेंवर अँजिओग्राफी केली जाणार
माणिकराव कोकाटे यांचा उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज त्यांची अँजिओग्राफी केली जाणार आहे. रुग्णालयात सध्या त्यांच्यासोबत मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे राजकीय वर्तुळासह पोलिस प्रशासनाचे बारकाईने लक्ष लागून आहे.




