Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव;...

Mayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव; वाचा कोणत्या महापालिकेत कुठले आरक्षण?

मुंबई | Mumbai

राज्यातील २९ महापालिकांसाठी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी आज (गुरुवारी) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीत ५० टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील १५ महापालिकांवर महिला महापौर असणार आहे. तर १४ ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळाली आहे.

- Advertisement -

या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) तीन जागा निघाल्या असून, यातील दोन महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) एक जागा राखीव झाली आहे. तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ८ जागा राखीव झाल्या असून, त्यातील ४ महिलांसाठी आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गातील १७ पैकी नऊ जागांवर महिला महापौर असणार आहेत.

YouTube video player

हे देखील वाचा : Mayor Reservation : २९ महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; नाशिक, अहिल्यानगर, जळगावमध्ये ‘या’ प्रवर्गाला संधी  

दरम्यान, या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. तसेच महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या प्रभागातील नियोजनात मोठे बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे नेमके कोणत्या महापालिकेत कुठल्या प्रवर्गाचा महापौर बसणार आहे, हे जाणून घेणार आहोत.

अ. क्रमांक महानगरपालिकेचे नाव आरक्षण – महिला \ खुला
मुंबई सर्वसाधारण (महिला)
नवी मुंबई सर्वसाधारण (महिला)
ठाणे अनुसूचित जाती (SC)
पुणे सर्वसाधारण (महिला)
नाशिक सर्वसाधारण (महिला)
धुळे सर्वसाधारण (महिला)
जळगाव ओबीसी – महिला
पिंपरी चिंचवड सर्वसाधारण (महिला)
कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती (ST) खुला
१० मीरा भाईंदरसर्वसाधारण
११ भिंवडी-निजामपूर सर्वसाधारण
१२ नागपूर सर्वसाधारण (महिला)
१३ अहिल्यानगर ओबीसी – महिला
१४ अकोला ओबीसी – महिला
१५ परभणी सर्वसाधारण
१६ छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण
१७ अमरावती सर्वसाधारण
१८ पनवेल ओबीसी (पुरुष)
१९ नांदेड-वायघाळ सर्वसाधारण
२० कोल्हापूर ओबीसी (पुरुष)
२१ सांगली-मिरज-कुपवड सर्वसाधारण (महिला)
२२ इचलकरंजी ओबीसी (पुरुष किंवा महिला)
२३ जालना अनुसूचित जाती (SC) (महिला)
२४ चंद्रपूर ओबीसी – महिला
२५ लातूर अनुसूचित जाती (SC) – (महिला)
२६ उल्हासनगर ओबीसी
२७ सोलापूर सर्वसाधारण
२८ मालेगाव सर्वसाधारण (महिला)
२९ वसई-विरार सर्वसाधारण

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....