Tuesday, February 3, 2026
Homeमुख्य बातम्याGirish Mahajan : "फडणवीस CM झाल्याने चांगलं झालं, मागील अडीच वर्षांचा काळ...

Girish Mahajan : “फडणवीस CM झाल्याने चांगलं झालं, मागील अडीच वर्षांचा काळ खूप वाईट”; मंत्री महाजनांचा रोख नेमका कुणाकडे?

मुंबई | Mumbai 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या (Local Body Elction) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपले स्वातंत्र्य मेळावे घेण्यास सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर काल जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्याने चांगलं झालं. मात्र, मागील अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असे वक्तव्य महाजन यांनी करत शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “सध्या भाजपकडे (BJP) सर्वाधिक पंचायत समित्या आहेत. ग्रामपंचायतींचे सरपंचही भाजपाचेच जास्त आहेत. आता आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचेच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत. जिल्हा परिषदेतही (Zilla Parishad) भाजपचे सदस्य असले पाहिजेत. जळगाव आणि नाशिक महानगरपालिकेत भाजपने उच्चांक गाठला पाहिजे. नाशिकमध्ये (Nashik) १२५ जागा आहेत. त्यापैकी १०० जागा भाजपला मिळायला हव्यात. हे काम केवळ एका व्यक्तीचे नाही, तर कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण हे करू शकतो”, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

पुढे ते म्हणाले की, “कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. त्या भानगडीत आपण पडायचे नाही. आता जे बडबड करत आहेत त्यांची काय परिस्थिती आहे याची माहिती तु्म्हालाही आहे. ज्यांना कुणीच विचारत नाही असेच लोक प्रसिद्धीसाठी काहीतरी बोलत असतात. आपल्याला बोललं म्हणजे त्यांना प्रसिद्धी मिळते, असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना लगावला. तसेच अडीच वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (CM) होते, तो काळ अधिक चांगला होता. पण मधील अडीच वर्षांचा काळ (एकनाथ शिंदे) आपल्यासाठी खूप वाईट होता. त्यानंतर मात्र आपल्याला स्पष्ट बहुमत मिळाले. या निवडणुकीत (Election) आपले १३२ आमदार निवडून आले”, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Nashik Mayor : भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झालेल्या आडके...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका हिमगौरी आडके (Himgauri Adke) आणि उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळसाहेब सानप...